Shehnaaz Gill : प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या तिच्या होमटाऊनमध्ये गेली होती. तिथे शहनाज तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. शहनाज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. शहनाजनं नुकतीच सुवर्ण मंदिराला भेट दिली. 


सुवर्ण मंदिरा येथील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये तिनं फुलाचे इमोजी शेअर केले आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. एका नेटकऱ्यानं शहनाजच्या फोटोला कमेंट केली, 'क्विन' तर दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलं, 'क्यूट दिसत आहेस' शहनाजच्या फोटोला आठ लाखपेक्षा जास्त लेकांनी लाइक केलं आहे. 






शहनाजनं फॅमिलीसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पर्पल पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. 






काही दिवसांपूर्वी शहनाजनं शिल्पा शेट्टीच्या शेप ऑफ यू या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि तिच्या नात्याबद्दल शहनाजनं सांगितलं होतं. शहनाजनला बिग बॉसच्या 15 व्या सिझनमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 


हेही वाचा :