Lock Upp : कंगना रनौत (Kangana Ranaut) सहसा कैद्यांचे म्हणजेच ‘लॉक अप’मधील (Lock Upp) स्पर्धकांची शाळा घेताना दिसतेय. परंतु, अलीकडेच 'क्वीन'ने जेलचा मूड बदलला आहे. कंगनाने सर्व स्पर्धकांना सांगितले की, त्यांच्या आवडीच्या सदस्याला किस करा. पण, त्यानंतरच सायशा (Saisha Shinde) आणि मंदाना (Mandana Karimi) यांनी असे काही केले की, लोकांना ते पाहून थोडे आश्चर्य वाटले. अल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शोचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सायशा म्हणताना दिसत आहे की, मंदाना तिला आकर्षित करते आणि नंतर ती तिला किस करते.


या व्हिडीओमध्ये 'प्रेम नेहमीच आपली छाप सोडते, आज तुम्हाला हेच करायचे आहे', असे म्हणताना कंगना रनौत दिसत आहे. यानंतर अंजली सायेशाचे कौतुक करते आणि ती खूप गोड असल्याचे सांगते आणि तिला चुंबन देते. पूनम पांडेने कीस करण्यासाठी पायल रोहतगीला निवडते आणि म्हणते की, 'मी काही गोष्टी केल्या आहेत ज्या कधी-कधी करू नयेत असे वाटते'.  तर, शिवम शर्मा आणि झीशान देखील मंदाना करीमीचे नाव घेतात.



दुसरीकडे, मुनव्वर फारुखीने सायशाचे चुंबन घेतले. परंतु, मंदानाचे कौतुक करताना सायशा तिला चुंबन देते. यावेळी सायशा म्हणते की, मंदाना तिला आकर्षित करते. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांना लिप लॉक केले आहे.


या सर्व गोष्टी प्रोमो व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत, जो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोरा यांच्यानंतर, तुरुंगात उपस्थित असलेल्या कैद्यांमध्ये सायशा सर्वात प्रसिद्ध झाली आहे. जर, आपण मंदानाबद्दल बोललो, तर एक महिन्यानंतर तिने 16वी स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे.


हेही वाचा :