Shamshera : शमशेरा (Shamshera) या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि  संजय दत्त (Sanjay Dutt) अशी तगडी स्टार कास्ट असणारा 'शमशेरा' (Shamshera) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काल (21 जून) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे. 


रणबीर कपूर (Ranbir Kapoor)
शमशेरा चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपट तो डबल रोज साकारणार आहे. रणबीरनं या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. शमशेरा चित्रपटासाठी रणबीरनं त्याच्या बॉडी आणि लूककडे विशेष लक्ष दिलं आहे. 


संजय दत्त (Sanjay Dutt)
संजय दत्त या चित्रपटामध्ये शुद्ध सिंह ही भूमिका साकारणार आहे. शुद्ध सिंह हा एक पोलीस अधिकारी आहे. या चित्रपटात संजय हा खलनायिकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी संजयनं आठ कोटींचे मानधन घेतले. 


वाणी कपूर (Vaani Kapoor)
वाणी कपूर ही शमशेरा या चित्रपटामध्ये एका डान्सरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी वाणीनं कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. वाणीनं या चित्रपटासाठी पाच कोटी मानधन घेतलं आहे. 


रोनित रॉय (Ronit Roy)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रोनित रॉय हा शमशेरा' चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी त्यानं चार कोटी मानधन घेतलं आहे. 


शमशेरा हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे.  'शमशेरा' चित्रपटाची निर्मिती  आदित्य चोप्रानं केली आहे.  22 जुलै  रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.


हेही वाचा: