Shahid Kapoor's Sister Wedding : बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर (Pankaj Kapur) आणि सुप्रिया पाठक (Supriya Pathak) यांची लाडकी मुलगी सना कपूर (Sanah Kapur) हिने मयंक पाहवासोबत (Mayank Pahwa) लग्नगाठ बांधली आहे. 2 मार्च रोजी महाबळेश्वरमध्ये सना कपूरने मनोज आणि सीमा पाहवा यांचा मुलगा मयंक पाहवासोबत सात फेरे घेतले. या भव्य लग्नसोहळ्यात, शाहिद कपूरची बहीण सना तिच्या साध्या आणि सुंदर वधूच्या लुकमुळे खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या लूकला पाहून तिच्यावर सर्वत्र कमेंट्सचा वर्षाव होतोय. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
शाहिद कपूरनेही बहीण सना कपूरसोबतचा एक गोंडस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शाहिदने एक इमोशनल नोटही लिहिली आहे. शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. "वेळ किती वेगाने उडतो, माझी छोटी बिटो आता वधू बनली आहे. सगळेच खूप लवकर वाढले. " शाहिदने पुढे लिहिले आहे, "माझी प्रिय बहीण देखील नवीन आयुष्य सुरू करत आहे. प्रिय सना कपूर, तू आणि मयंक नेहमी सुखी राहा."
त्याचवेळी, लग्नानंतर सनाने तिच्या इंस्टाग्रामवर मयंक पाहवासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. यासोबतच तिने हार्ट इमोजीही पाठवला आहे.
महत्वाच्य बातम्या :
- Shahid Kapoors Sister Wedding : शाहिद कपूरची बहिण सना अडकणार लग्नबंधनात; मयंकसोबत बांधणार लग्नगाठ
- Shahid Kapoor : बहीण सनाच्या लग्नात शाहीद कपूरची पत्नी मीरासोबत धमाल, चाहत्यांकडून फोटोवर कमेंट्सचा वर्षाव
- Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील नव्या ट्विस्टची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha