Shahid Kapoor Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कृती सेनन (Kriti Sanon) सध्या त्यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात शाहिद आणि कृती यांच्या दरम्यान लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. सिनेमात कृती एका फिमेल रोबोटची भूमिका साकारणार आहे.  शाहिद आणि कृतीचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, निर्मात्यांनी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज झालं आहे. 


शाहीद कपूर आणि क्रिती सेननच्या रोमान्सची चर्चा


टायटल ट्रॅक निर्मात्यांनी रिलीज केले आहे. या गाण्याला टी सिरीजने युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. टायटल ट्रॅकमध्ये शाहिद कपूर आणि कृती सेनन रोमान्स करताना दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आत्तापर्यंत या गाण्याला 6 मिलीयन पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. शाहिद आणि कृतीच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमाच टायटल ट्रॅक युट्युबवर ट्रेंड होत आहे. त्यामुळे टायटल ट्रॅकच्या तुफान चर्चा रंगल्या आहेत. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमात शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमात शाहिद एक रोबोटिक्स इंजिनिअर आहे. त्यामुळे त्याची भूमिका कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय भोवती फिरताना दिसणार आहे. 


सिनेमाबाबत कृती काय म्हणाली?


अभिनेत्री कृती सेनन सिनेमाबाबत बोलताना म्हणाली, "मी सिनेमाची स्टोरी ऐकली तेव्हा मला फार मजा आली. टेक्नोलॉजी निगडीत असलेल्या या सिनेमची स्टोरी अतिशय वेगळी असणार आहे." पुढे बोलताना कृती म्हणाली एआय ज्या पद्धतीने प्रगती करत आहे. तो विचार केला असता वाटते की, भविष्यात सिनेमा सत्यात देखील उतरेल. 


शाहिद काय म्हणाला?


अभिनेता शाहिद कपूर सिनेमाबाबत बोलताना म्हणाला, "सिनेमात कृतीची भूमिका टेक्नोलॉजीचे प्रतिक आहे." याशिवाय शाहिदने टेक्नोलॉजी आणि माणूस यांच्या नात्याबाबतही भाष्य केले आहे. शाहिद म्हणाला की, टेक्नोलॉजीसोबत काम करताना किंवा वापरताना माणसाचा सर्वाधिक वेळ जातोय. त्यावर आधारित एक पाऊल पुढे टाकत हा सिनेमा बनवण्यात आला आहे. दरम्यान सिनेमाचे प्रमोशन करताना कृती आणि शाहिद रोज वेगवेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या 


Malaika Arora : वयाची पन्नाशी गाठलेली मलायका स्कर्ट-टॉप घालून येताच कमेंटचा पाऊस