Shahid Kapoor : शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput) हे बी-टाऊनमधील सर्वांच्याच आवडीचं जोडपं आहे. त्यांच्या नात्याविषयी ते अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. तसेच ते दोघंही बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांना अनेक आनंदाच्या बातम्याही देत असतात. दोन महिन्यांपूर्वी शाहिद आणि मीराने जुहूमध्ये एका आलिशान घराची खरेदी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी एक आलिशान घर खरेदी केलं आहे. शाहिद आणि मीरा यांनी मुंबईतच नवं घर खरेदी केलं आहे. 


IndexTap.com च्या रिपोर्ट्नुसार, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी मुंबईच्या वरळी भागातील ओबेरॉय 360 वेस्टमध्ये घरं घेतलं आहे. तसेच हे अपार्टमेंट 5,395 चौरस फूट आहे आणि तीन पार्किंगसाठीच्या जागा देखील आहेत. त्यांनी 24 मे 2024 रोजी हे घर खरेदी केल्याची माहिती देण्यात आलीये. 


घराची किंमत किती?


'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, पूर कुटुंबाने चंदक रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केले होते. तसेच या घराची किंमत 59 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती देखील देण्यात आलीये. सध्या त्यांच्या नव्या घराची बरीच चर्चा आहे. तसेच  24 मे 2024 रोजी त्याने या घराचा संपूर्ण व्यवहार केला असून त्याच्या मालमत्तेची एकूण किंमत ही  58.66 कोटी रुपये आहे. 






बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) मीरा राजपूतसोबत  (Mira Rajput) 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. शाहिद आणि मीरा यांच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. ही जोडी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. अनेक वेळा मुलाखतींमध्ये शाहिद आणि मीरा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगत असतात.                                      






ही बातमी वाचा : 


Sameer Pranjape : आठ वर्षांनी अभिनेत्याची स्टार प्रवाहवर पुन्हा एन्ट्री, 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला