Pathan Teaser : अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh khan), जॉन अब्राहम (John Abraham) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची प्रमुख भूमिका असणारा पठाण या चित्रपटाची गेली अनेक दिवस चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा टीझर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. शहारूखने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पठाण या चित्रपटाचा टीझर शेअर करून शाहरूखनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'मला माहिती आहे की टीझर शेअर करायला खूप उशिर झाला आहे. पठाण 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तारिख लक्षात ठेवा. हा चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जवळच्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट नक्की पाहा. 'टीझरमध्ये दिसत आहे की, दीपिका आणि जॉन हे 'पठाण' या भूमिकेबाबत सांगत आहेत.
ओम शांती ओम आणि चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटांमधील शाहरूख आणि दीपिका यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पठाण या चित्रपटात या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Ranveer Singh : 'जबरा फॅन'; पाठीवर काढला टॅटू, रणवीर म्हणाला...
- Jhund : 'झुंड' चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन; म्हणाले, 'माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha