Suhana Khan Alibaug Land Purchase Case: बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) एकुलती एक मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सध्या चर्चेत आली आहे. ना ती कोणत्या सिनेमात झळकणार आहे, ना ती दुसऱ्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करतेय. एक जमीन घोटाळाप्रकरणामुळे सुहाना खान चर्चेत आली आहे. या प्रकरणात सुहाना खानच्या अडचणींत वाढ झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात...

शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं रायगड जिल्ह्यातील अलिबाग (Alibaug In Raigad District) भागात कोट्यवधी रुपयांची शेत जमीन खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. पण, या जमीन खरेदी प्रकरणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या कायद्यानुसार, फक्त शेतकरीच शेती जमीन खरेदी करू शकतो. अशातच सुहाना खाननं स्वतः शेतकरी असल्याचं दाखवत जमीन खरेदी केल्यामुळे वादात सापडली आहे. दरम्यान, चौकशीनंतर जमीन करार रद्द होण्याची किंवा दंड आकारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

22 कोटींना खरेदी केल्यात दोन जमिनी 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यवहारात सुहानाचं वर्णन शेतकरी म्हणून करण्यात आलं होतं, पण प्रशासनानं या व्यवहाराबाबत कारवाई करत नोटीस बजावली आहे. 2023 मध्ये मिळालेल्या कागदपत्रांनुसार, सुहानानं अलिबागमध्ये सुमारे 12 कोटी 91 लाख रुपयांना जमीन खरेदी केली होती, जी देजा वू फार्म प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर नोंदणीकृत होती.

शेतीसाठी राखीव होती सुहानानं खरेदी केलेली जमीन 

सुहानानं मुंबईतील अलिबाग येथील थळ गावात एक मोठा जमिनीचा तुकडा घेतला होता. ही जमीन सरकारनं शेतीसाठी राखीव ठेवली होती, ज्यावर फक्त शेतकरीच शेती करू शकतात. सुहानानं गावातील ही जमीन अंजली, रेखा आणि प्रिया या तीन बहिणींकडून घेतली होती. या तिन्ही बहिणींना ही जमीन त्यांच्या पालकांकडून वारसा हक्कानं मिळाली होती.

लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली

सुहाना खाननं ही जमीन खरेदी केली तेव्हा, तिनं त्यासाठी सुमारे 77.46 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीही भरली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत अलिबागच्या तहसीलदारांकडून अहवाल मागवला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: हायप्रोफाईल केस; शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, लावलेत अनेक गंभीर आरोप