FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. दोघेही सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बॉलिवूडच्या दोन्ही दिग्गज स्टार्स विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. दोघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांवरही अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. एका व्यक्तीनं दोन्ही स्टार्स विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयानं शाहरुख-दीपिकाविरुद्ध एफआयआर (FIR Against Shahrukh-Deepika) नोंदवण्याचे आदेश दिले, त्यानुसार दोन्ही स्टार्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण वादात अडकले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी ओम शांती ओम आणि चेन्नई एक्सप्रेस सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता राजस्थानमध्ये दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या याचिकेनंतर न्यायालयानं शाहरुख-दीपिकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रकरण नेमकं काय? हे सविस्तर जाणून घेऊयात...
प्रकरण नेमकं काय?
शाहरुख आणि दीपिका ज्या प्रकरणात अडकले आहेत, ते मुळात राजस्थानातील भरतपूरचं आहे. वकील कीर्ति सिंहनं दोन्ही स्टार्सविरोधात कोर्टात एक याचिका दाखल केली होती आणि आता कोर्टानं या प्रकरणी दोन्ही सुपरस्टार्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी डिफेक्टिव व्हीकल्सच्या मार्केटिंगचा आरोप शाहरुख आणि दीपिका विरोधात लावण्यात आला आहे.
गुन्हा नोंदवल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. कीर्ती सिंह यांचा आरोप आहे की, त्यांनी 2022 मध्ये सुमारे 23.97 लाख रुपयांची कार खरेदी केली. त्यानंतर त्यांनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसकडून कार कर्जही घेतलं आणि त्यातील अर्धी रक्कम रोखीनं भरली.
तक्रारीत काय म्हटलंय?
तक्रारीत म्हटलंय की, जेव्हा ही समस्या कंपनी आणि डीलरला कळवण्यात आली, तेव्हा त्यांनी ते उत्पादनातील दोष असल्याचं मान्य केलं आणि कोणताही ठोस उपाय देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर वाहन बदलण्याची किंवा पैसे परत करण्याची मागणी देखील नाकारण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात, कंपनीच्या अधिकाऱ्यांसह, ब्रँड अॅम्बेसेडर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावरही या कारची जाहिरात केल्याचा आणि ग्राहकांना दिशाभूल करण्यात जबाबदार भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: