Bollywood Actress Gauahar Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार (Zaid Darbar) यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. दोघांनीही आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. बुधवारी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करुन दोघांनी चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली. आपल्या पोस्टमध्ये जोडप्यानं म्हटलंय की, त्यांचा मोठा मुलगा जेहानला आता लहान भावंड मिळाल्यामुळे खूप आनंद झालाय.  

Continues below advertisement






बुधवारी या जोडप्यानं इंस्टाग्रामवर एक अधिकृत पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.  गौहर खानला पहिला मुलगा आहे, त्याचं नाव जेहान आहे. गौहर खाननं इंस्टाग्रामवर पोस्ट करून तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी शेअर केली. गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली असून तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 


गौहर खानची इन्स्टा पोस्ट


गौहर खाननं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिलंय की, जेहानच्या आनंदाला सीमा नाही. जेहानला भाऊ मिळाला आहे. गौहर खानची प्रसूती 1 सप्टेंबर रोजी झाली. तिनं सर्वांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी आभार मानले आहेत.






गौहर खान आणि जैदची स्पेशल पोस्ट 


गौहर आणि जैदनं त्यांच्या पोस्टमध्ये दोन लहान बछड्यांसह सिंह आणि सिंहिणीचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिलंय की, "बिस्मिल्लाह हिर रहमान नीर रहीम. 1 सप्टेंबर 2025 रोजी जन्मलेल्या त्याच्या लहान भावासोबत त्याचं साम्राज्य शेअर करताना जेहान खूप आनंदी आहे. आमच्या आनंदी कुटुंबासाठी सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद शुभेच्छा. कृतज्ञ आणि खूप खूप आनंदी पालक, जैद आणि गौहर..." गौहर आणि जैदनं ही पोस्ट करताच व्हायरल झाली आणि लोकांनी या जोडप्याबद्दल चर्चा करण्यास आणि त्यांचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट करुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


56 वर्षीय WWE स्टार बटिस्टाचे 27 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लफडं! फोटो व्हायरल