Devdas and Tere Naam Returning to Big Screens: शाहरूख खान आणि सलमान खान हे बॉलिवूडमधील दोन सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिस कमाई केली नाही तर, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यही गाजवलं. दोन्ही खानचे चित्रपट अजूनही आवर्जून पाहिले जातात. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात दोघांचे हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सलमान खानचा 'तेरे नाम' आणि शाहरूख खानचा 'देवदास' हे दोन्ही चित्रपट सिनेमागृहात री रिलीज होणार आहेत. पण हे दोन्ही चित्रपट नेमकं कोणत्या तारखेला पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार? हे जाणून घेऊयात.
सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट सिनेमागृहात 2003 साली प्रदर्शित झाला होता. सतीश कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका चावला मुख्य भूमिकेत आहेत. राधेच्या स्टोरीमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी पीव्हीआर आणि आयएनओएक्सवर पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून 'तेरे नाम' हा चित्रपट रि रिलीज करण्यात यावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. दरम्यान, या चित्रपटाचा अनुभव पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांना थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ 24 वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो. हा चित्रपट पुन्हा एकदा 6 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
तेरे नाम आणि देवदास व्यतिरिक्त आणखी एक चित्रपट पुन्हा सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित युवा हा सिनेमा पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
आलिया भट्ट सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करणार? म्हणाली, 'मला फक्त अभिनेत्री...
'हे एक षडयंत्र..बरोबर ना?' अजित पवार यांच्या निधनावर राखी सावंतचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
