Sunetra Pawar DCM Oath: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. याचदरम्यान गेल्या तीन दिवसांत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय काय घडलं?, याची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. (Sunetra Pawar DCM Oath)

पडद्यामागे नेमकं काय घडलं?, आजच शपथविधी का होणार?, Inside Story (Sunetra Pawar)

अजित पवार यांच्या निधनानंतर पुन्हा पक्ष सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न पवार कुटुंबात सुरू झाला होता. ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केले, त्यावेळी ते एकटे पडले होते. अजित पवार एकटे एकीकडे आणि संपूर्ण कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती निर्माण झाली होती.  पवार कुटुंबातील एकही व्यक्ती अजित पवार यांच्या बाजूने नव्हती. अजित पवार यांनी ज्या परिश्रमाने पक्ष उभा केला, तो सुरक्षित ठेवणे, हे पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी कर्तव्य मानले. 

पतीचे काम टिकवणे याला या दुःखातही पत्नीने कर्तव्य मानले. आधी सुनेत्रा पवार यासाठी तयार नव्हत्या. पण तुम्ही असे केले नाही तर अजित पवार यांचे स्वप्नच अधुरे राहिल, पक्ष हातातून गेला तर अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न अधूरे राहिल, याचे भान राखत त्यांनी जड अंतःकरणाने होकार दिला. त्यामुळे आधी पक्ष आणि नंतर विलीनीकरण चर्चा असा निर्णय अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी घेतला. म्हणूनच आधी शपथविधी घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार कुटुंबीयांनी घेतला. आता पक्ष सोबत घेऊन त्या विलीनीकरणाची चर्चा पुढे नेतील, अशी माहिती आहे.

सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार? (Sunetra Pawar Ajit Pawar NCP)

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाचे खातेही होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते.  आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील. इतर कुणाचा ही शपथविधी नसणार आहे. 

गेल्या तीन दिवसांत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Sharad Pawar On Sunetra Pawar And Ajit Pawar: अजितदादांची ती इच्छा पूर्ण व्हावी, आज अजित असता तर...; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी शरद पवार मनातलं सगळं बोलले!

Sunetra Pawar DCM Oath: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार?; A टू Z माहिती