Rakhi sawant on ajit pawar death news: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले.  बारामतीत विमान लँडिंग करत असताना भीषण अपघात झाला आणि अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला.  अजित पवार यांच्या मृत्यूनंतर नेते मंडळींसह सिनेकलाकारांनी दु:ख व्यक्त केलं. सतत चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंतने देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ती पापाराझींसमोर बोल्ड अवतारात समोर आली होती. "अजित पवार यांच्या मृत्यूमागे राजकारण नाही, परंतु, षडयंत्र आहे", असं तिनं पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं होतं. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

अजित पवार यांच्या निधनावर राखी सावंत म्हणते, "मी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आले आहे. मला ही बातमी ऐकून खूप दु:ख झाले आहे.  या घटनेमागे राजकारण नाही. परंतु, हे एक षडयंत्र आहे. ते आमचे एक आवडते नेता होते. ही घटना षडयंत्र आहे, बरोबर ना...?" असं तिनं पापाराझींसमोर म्हटलं होतं.  राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   दरम्यान, नेटकऱ्यांनी तिच्या आऊटफिटवरून तिला ट्रोल केलं. राखी सावंत पापाराझींसमोर बोल्ड आऊटफिट घालून आली होती. तिनं मरून रंगाचा  ड्रेस घातला होता. या ड्रेसवरून तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.

 

Continues below advertisement

सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार अशी चर्चा होती, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.  शपथविधी पार पडल्यानंतर त्या राज्यातील पहिल्या उपमुख्यमंत्री असतील.   

मिळालेल्या माहितीनुसार,  आज दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्री पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती आहे.  अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ खातंही होते.  मात्र, अर्थ खाते वगळता सुनेत्रा पवार यांच्याकडे इतर खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.