Shah Rukh Khan and Aamir Khan on Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज (दि.17) 75 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड देखील पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचा दणक्यात साजरा करताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानेही पीएम मोदींना खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता आमिर खान यांनेही ट्वीटरवर पोस्ट करून पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खानची पीएम मोदींसाठी खास पोस्ट
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर व्हिडिओ संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. पोलंडमध्ये आपल्या आगामी आणि बहुप्रतिक्षित “किंग” या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानाच, बुधवारी त्यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून मोदींना शुभेच्छा दिल्या. व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणाला, “आज आदरणीय पंतप्रधान मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. एका छोट्या शहरातून जागतिक मंचापर्यंतचा तुमचा प्रवास, तुमची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. या कथेत तुमचं शिस्तबद्ध जीवन, कठोर परिश्रम आणि देशासाठीचं समर्पण स्पष्ट दिसतं. खरं तर सर, 75 व्या वर्षी तुमची ऊर्जा आम्हा तरुणांनाही मागे टाकते. मी प्रार्थना करतो की तुम्ही नेहमी निरोगी, तंदुरुस्त, सबळ आणि आनंदी राहा.”
आमिर खाननेही दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान म्हणाला, “आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सर. भारताच्या विकासातील आपला सहभाग सदैव लक्षात राहील. या आनंदाच्या प्रसंगी आम्ही आपल्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि आपण देशाला प्रगतीच्या मार्गावर नेत राहावं अशी अपेक्षा करतो.”
आशा भोसले यांच्याकडूनही पीएम मोदींना शुभेच्छा बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीची, समर्पणाची आणि प्रभावी भाषणांची प्रशंसा केली. त्यांनी मोदींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या कार्यात सतत यश लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या