Satish Joshi Death :  मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचं निधन झालं आहे. रंगोत्सवात व्यासपीठावरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी दिली. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. 


चाहत्यांनी देखील सतीश जोशी यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता.'



सतीश जोशी यांची कारकिर्द


सतीश जोशी अनेक मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. त्यांची झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आणि त्यांची ही भूमिका गाजली देखील. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक नाटकांमधून आणि सिनेमांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 



रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास


दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये सतीश जोशी यांना भूमिका ठरलेल्या असायच्या. साहित्य संघाच्या मच्छकटिका नाटकातून काम केले होते. त्यामुळे सर्वच कलाकारांना त्यांच्या निधनाची बातमी कळताच खूप मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी रंगभूमीवर अखेरचा श्वास घेतला आहे. सतीश जोशी यांना देखील रंभूमीवरच देवाज्ञा झाली.सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात सतीश जोशी देखील सहभागी झाले होते.  सृजनोस्तव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.                                                                                                                                             


ही बातमी वाचा : 


Kshitij Zarapkar Death : 'एकुलती एक' फेम अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास