Kshitij Zarapkar Death : मराठी सिनेसृ्ष्टीतून एक दु:ख बातमी समोर आली आहे. एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले अभिनेते क्षितीज झारापरक यांचे (Kshitij Zarapkar) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. क्षितीजने वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान क्षितीज हा चर्चा तर होणारच या आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण त्याच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


क्षितीज यांचे कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्षितीज यांनी गोळाबेरीज, ठेंगा, एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक महिन्यांपासून ते आजाराशी लढत होते. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारा त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येतील.          


अभ्यासू दिग्दर्शकाचे निधन


त्यांच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. गोळाबेरीज, बायकोच्या नकळत यांसारख्या अनेक सिनेमांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे ठेंगा, एकुलती एक यांसारख्या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या अनेक सिनेमा आणि नाटकांमधून त्यांचं दिग्दर्शन, लेखन प्रेक्षकांच्या समोर आलं आहे. अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. पण अनेक ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचंही अनेक कलाकारांकडून सांगण्यात येत होतं. पण रविवार 5 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


एक अभ्यासू नट, एक अभ्यासू दिग्दर्शक अशी क्षितीज यांची ओळख होती. त्यामुळे आज मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरील एक अभ्यासू नट हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनेक कथांमध्ये, सिनेमांमध्ये एक मेसेज दिला जायचा. तो मेसेज समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जायचा.


 


ही बातमी वाचा : 


पहिले अस्वस्थ झाली, मग थेट बोलली; ऋषभ पंतसोबत लग्नाच्या प्रश्नावर उर्वशी रौतेलाने काय उत्तर दिलं?, पाहा Video