Sarika : अभिनेत्री सारिकाचे (Sarika) चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सारिका वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. रिपोर्टनुसार, सारिकाचे वडील तिला बालपणी सोडून गेले होते. बालपणापासूनच सारिकानं काम करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सारिकाचं शिक्षण देखील पूर्ण झालं नाही.
सारिका आणि तिच्या आईमधील वादांमुळे सागरिका घर सोडून चेन्नईमध्ये गेली. त्यानंतर सारिकाची ओळख अभिनेता कमल हसनसोबत (Kamal Haasan) झाली. कमल हसन आणि सारिका हे एकमाकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहायचे ठरवले. 1986 मध्ये कमल हसन आणि सारिकाला मुलगी झाली. त्या मुलीचे नाव त्यांनी श्रुती (Shruti Hassan) असं ठेवल. श्रुती ही सध्या अभिनय क्षेत्रामध्ये काम करते. कमल हसन आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर 16 वर्षांनी 2004 मध्ये कमल हसन आणि सागरिका हे विभक्त झाले.
रिपोर्टनुसार, सागरिकाच्या दोन्ही मुली म्हणजेच श्रुती आणि अक्षयरा यांनी सारिकासोबत राहण्यास नकार दिला होता. गीत गाता चल, जिद, तहान, परजानिया, प्रतिमा और पायल, भेजा फ्राई, राज तिलक आणि श्रीमान श्रीमती या चित्रपटांमध्ये सागरिकानं प्रमुख भूमिका साकारली. सागरिकाची मुलगी श्रुती हसन ही दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम करते.
महत्वाच्या बातम्या
- Jhund : ‘नागराज ऑस्कर आणेल याची खात्री!’, ‘झुंड’ पाहून भारावलेल्या वैभव मांगलेंची पोस्ट
- Elizabeth Hurley : वयाच्या 56 व्या वर्षी सिक्स पॅक्स; एलिझाबेथच्या फिटनेसची सोशल मीडियावर चर्चा
- Sonakshi Sinha,Salman Khan : 'सलमान खानसोबत गुपचूप लग्न?'; सोनाक्षी म्हणाली...
- Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये हळहळ, रणवीर सिंहपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha