Santosh Juvekar Movie Ravrambha : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता पहिल्यांदाच एका ऐतिहासिक सिनेमात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी 'रावरंभा' (Ravrambha) सिनेमात 'जालिंदर' या भूमिकेत तो दिसणार आहे.


संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळया धाटणीची जालिंदर ही  भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो? हे 'रावरंभा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.


संतोष जुवेकरने शेअर केलं 'रावरंभा'चं पोस्टर (Santosh Juvekar Shared Ravrambha Poster)


'रावरंभा' (Raavrambha) सिनेमातील जालिंदरचं पोस्टर शेअर करत संतोषने लिहिलं आहे,"माझा पहिला ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आणि माझी पहिलीच एक नेहमीपेक्षा खुपशी वेगळी भूमिका असलेला चित्रपट 'रावरंभा'. 'रावरंभा' हा सिनेमा 12 मेपासून तुमच्या मनोरंजनासाठी दाखल होत आहे. शुभेच्छा असूद्यात आणि मोलाची आणि महत्त्वाची साथ असुद्यात. जय शिवराय... जय भवानी जय शिवाजी". 


'रावरंभा' या सिनेमातील जालिंदरच्या भूमिकेबद्दल संतोष म्हणाला,"वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं. 'रावरंभा'च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली".






संतोष पुढे म्हणाला,"वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम 'जालिंदर'ला मिळेल असा मला विश्वास आहे".  संतोषच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


'रावरंभा'बद्दल जाणून घ्या... (Raavrambha Marathi Movie Starcast)


'रावरंभा' या सिनेमात ओम भूतकर (om bhutkar) 'राव' या भूमिकेत दिसून येणार आहे. तर अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) 'रंभा' या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहे. 'रावरंभा' हा सिनेमा येत्या 12 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Raavrambha : इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अनोखी प्रेमकथा घेऊन येतोय ओम भूतकर; 'रावरंभा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज