Sanskruti Balgude : पिंजरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कधी तिच्या अभिनयाने तर कधी तिच्या नृत्याने संस्कृतीने रसिकांची मनं जिंकलीत. पण या अभिनेत्रीच्या आयुष्यात एक वाईट काळही येऊन गेला. त्यातून उभं राहत संस्कृतीने पुन्हा एकदा कमबॅकही केलं. याच सगळ्या अनुभवांविषयी संस्कृतीने नुकत्याच सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. 


यावेळी संस्कृतीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले आहेत. तसेच तिने मराठी सिनेसृष्टीमधील पुरुष वर्चस्ववादी मानसिकतेविषयी देखील तिची स्पष्ट मतं मांडली आहे. अनेकदा सिनेमातल्या अभिनेत्रीचं कास्टिंग हिरोच ठरवतो असंही तिने यावेळी म्हटलं. 


संस्कतीने सांगितला तिचा अनुभव


एका सिनेमाचा अनुभव सांगताना संस्कृतीने म्हटलं, की एका सिनेमासाठी माझं कास्टिंग झालं होतं, दिग्दर्शकाने, कास्टिंग दिग्दर्शकाने फोन करुन मला सांगितलं की आपण हे सुरु करतोय. पण नंतर त्यांनी मला फोन करुन सांगितलं की, जो अभिनेता आहे, त्यानं म्हटलं की, मी दुसऱ्या कास्टिंगचा विचार करेन. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतलं अभिनेत्रीचं कास्टिंग देखील अनेकदा हिरोच ठरवतात, असंही संस्कृतीने म्हटलं आहे. 


मराठी सिनेसृष्टीत पुरुष वर्चस्ववादी मानसिकता आहे का?


या प्रश्नाचं उत्तर देताना संस्कृतीने म्हटलं की, होय, ती पुरुष वर्चस्ववादी मानसिकता खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्याचमुळे जे घडायला हवं ते घडत नाहीये. तुमच्या ज्या काही सिनेमाकडून अपेक्षा आहेत, की एका उंचीवर आपला सिनेमा पोहचायला हवा, तो पोहचत नाहीये कदाचित. कारण तुमचं कास्टिंगच बरोबर नाहीये. मी फक्त माझ्याबाबतीत म्हणत नाहीये, मी एकूणच सगळ्या बाबतीत म्हणतेय. एखादा सिनेमा पाहून मला वाटू शकतं की हिच्याजागी ह्या अभिनेत्रीने छान केलं असतं. 


पुढे तिने म्हटलं की, पण काय होतं ना की जेव्हा तुम्ही पोटेनशिअर पण कॉम्प्रमाईज करता. मी तुम्हाला सिनेमात नको असेन पण मला माहितेय, की मी जर सिनेमात आले तर मी विशिष्ट गोष्ट घेऊन येईन.  त्यामुळे एक गोष्ट तुम्ही माझ्याकडून घेऊ शकत नाही, ते म्हणजे माझं टॅलेंट आणि कष्ट, कारण यांना एक्सपायरी डेटच नाहीये. या दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहेत आणि त्या मी करायला तयार देखील आहे.  पण या पुरुष वर्चवस्वादी मानसिकतेपुढे तू काहीच करु शकत नाही, त्यावर तुम्ही डोकंही फोडू शकत नाही. मग तुम्ही त्यावर डोकं का आपटूनही काही होणार नाहीये. ते सोडून तुम्हाला मुव्ह ऑन व्हायलाच हवं. 


ही बातमी वाचा : 


Marathi Actress In Bollywood : मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता करणार दिग्दर्शन