Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala : आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे (Dnyaneshwar Maharaj Palkhi) पंढरपूच्या (Pandharpur) दिशेनं प्रस्थान होणार आहे. यानिमित्त आळंदीत वारकऱ्यांची (Warkari) मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंद्रायणीचा (Indrayani) काठ वाऱ्यकऱ्यांनी फुलला आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या गरजात वारकरी तल्लीनं झाल्याचं चित्र आज आळंदीत पाहायला मिळत आहे. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पालखीचे प्रस्थान झाले आहे. 


इंद्रायणीच्या घाटावर मोठ्या उत्साहच वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. या सोहळ्याचे निमित्ताने तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली आहे. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. आज आळंदी हरिनामाच्या गजरात दंग झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारण 250 किलोमीटरचा पल्ला पायी पूर्ण करणार


वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारण 250 किलोमीटरचा पल्ला पायी पार करतात. मात्र या वारकऱ्यांना ना कुठे शीण येत ना वारकरी दमतात कारण वारकरी नाचत गात टाळ वाजवत आणि हरिनामाचा गजर करत न हरता पुढे चालतात फुगडी भजन मजल दर मजल गाठत असतात. वारीत शेतकरी मंडळी जास्त प्रमाणात सहभागी होतात. तसेच नोकरदार, सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण तरुणी देखील मोठ्या प्रमाणात या वारीत सहभागी होतात. दरम्यान, थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील 47 मानाच्या दिंड्या मंदिराच्या आवारात दाखल झाल्या आहेत. ज्ञानोबा तुकोबांचा गजराता वारकरी दंग असल्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


इनामदार वाड्यातील मुक्काम पूर्ण करून संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ


दरम्यान, इनामदार वाड्यातील मुक्काम पूर्ण करून संत तुकाराम महाराजांची पालखी आज मार्गस्थ झाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ झाला आहे. सकाळी इनामदार वाड्यात शासकीय पूजा पार पडली. इनामदार वाड्यात वारकऱ्यांकडून पंचपती करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची आरती होऊन पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडली. इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर सर्वांनी एकच तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा गजर केला.


 महत्वाच्या बातम्या:


Ashadhi Wari 2024 : संत मुक्ताबाईच्या पालखीने बैल जोडीच्या साह्याने चढला प्रसिद्ध राजुर घाट; पालखीला पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान