Marathi Actress In Bollywood :  विविध विषयांची हाताळणी करणारी निर्माती, मराठी अभिनेत्री आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. निर्माती आणि अभिनेत्री म्हणून ठसा उमटवलेल्या तृप्ती भोईर (Trupti Bhoir) आता नव्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी "पारो ' द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी' या चित्रपटाच्या माध्यमातून तृप्ती भोईर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (Gajendra Ahire) करणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून गजेंद्र अहिरे हे देखील बऱ्याच कालावधीनंतर हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 


तृप्ती भोईरने आपल्या सिनेकारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यात तृप्तीने साकारलेली अगडबममधील नाजूका आणि टुरिंग टॉकिज मधील चांदी ही तिची भूमिका चांगलीच गाजली. आता आपल्या नव्या भूमिकेसह, विषयासह तृप्ती भोईर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. "पारो  द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी' या हिंदी सिनेमात तृप्ती भोईर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्या सोबत ताहा शाह बदुशाह झळकणार आहे. त्याशिवाय गोविंद नामदेव आणि इतर कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाच्या केंद्रस्थानी महिलांचे प्रश्न असणार आहेत. 






गजेंद्र अहिरे आणि तृप्ती भोईर यांचा टुरिंग टॉकीज हा सिनेमा आंतराष्ट्रीय पातळीवर विशेष रूपाने गाजला होता. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 'पारो द अन टोल्ड स्टोरी ऑफ स्लॅव्हरी' या चित्रपटाची कथा तृप्ती भोईर यांची असून पटकथा आणि गीत गजेंद्र अहिरे यांची आहेत. चित्रपटाला सतीश चक्रवर्थ्य  हे संगीतबद्ध करणार आहेत.  चित्रपटाचे संकलन दिग्गज संकलक बल्लू सलूजा करणार आहेत. 


> तृप्ती भोईरची कान्समध्ये हजेरी




मागील महिन्यात पार पाडलेल्या कान्स फेस्टिवलमध्ये तृप्तीने रेड कार्पेटवर आपल्याच अंदाजात हजेरी लावली. अभिनेत्री तृप्ती भोईर तिच्या आगामी हिंदी चित्रपटासाठी खास लूकमध्ये दिसली. तृप्तीने नवरीच्या वेशभूषेत गळ्यात Bride On Sale 6000 Rs. असा फलक झळकवला होता. 


इतर महत्त्वाची बातमी :