Sanskruti Balgude : सध्या अनेक मराठी कलाकार त्यांच्या अभिनयाची बॉलीवूडमध्ये सोडत आहे. जितकं मराठी सिनेसृष्टीत त्यांच्या कामाचं प्रेक्षक कौतुक करतायत तितकचं त्यांच्या बॉलीवूडच्या कामाचंही कौतुक केलं जातंय. अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर ( Sai Tamhankar), प्रिया बापट (Priya Bapat), वैभव तत्ववादी या कलाकारांनी बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट गाजवले आहेत. अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही देखील तिच्या बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे. 


असूर, फॅमिली मॅन या सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या शरीब हश्मीसोबत संस्कृती झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अनेक कलाकार मराठीच्या सोबतीने बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतात. बॉलिवुड गाजवणारी ही मराठी कलाकार मंडळी बॉलिवुड मध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करत असून बॉलिवुड मध्ये मराठीच नाव मोठं करताना दिसतात. सई ताम्हणकर , अमृता खानविलकर , प्रिया बापट , वैभव तत्ववादी, गिरिजा ओक यांच्या बॉलिवुड पदार्पणा नंतर आता अभिनेत्री संस्कृती बालगुडे देखील एका बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. हे मराठी कलाकार हिंदी इंडस्ट्रीत अनोख्या अभिनय कौशल्याने चर्चेत आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे हे मराठी कलाकार हिंदीत चर्चेचा विषय ठरतात. 


अद्याप प्रोजेक्टविषयी कोणतीही माहिती नाही


अभिनय , नृत्य आणि अनेक कलांची आवड जोपासणारी अभिनेत्री म्हणून संस्कृती बालगुडे ओळखली जाते. संस्कृती लवकरच एका बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. बॉलिवुड अभिनेता शारिब हाश्मी सोबत ती या हिंदी- इंग्रजी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. हा बॉलिवुड प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे कोणा सोबत असणार आहे या बद्दल काही  समजलं नसल तरी लवकरच या बद्दल ती अधिकृत माहिती देणार असल्याचं कळतंय. संस्कृती बालगुडे ही कायम फॅशन , नृत्य आणि तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते आणि आता ती बॉलिवुड मध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे. 


कलाकारांच्या आगामी बॉलीवूड चित्रपटांची चर्चा


हंटर , मिमी आणि आता " भक्षक " सारख्या नावाजलेल्या चित्रपटात काम करून सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये झळकली आहे. आगामी काळात ती अजून एका प्रोजेक्ट मधून बॉलिवुड मध्ये दिसणार आहे. " लुटेरा " या आगामी वेब सीरिज मधून अमृता पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये जोरदार पदार्पण करणार असून तिने राझी , मलंग सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप बॉलिवुड मध्ये पाडली होती. प्रिय ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिका साठी ओळखली जाते आणि रफुचक्कर , सिटी ऑफ ड्रीम्स सारख्या उत्तम बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये प्रिया दिसली होती.  


ही बातमी वाचा : 


Elvish Yadav on Aryan Khan : एल्विशने कधी काळी आर्यन खानला केलं होतं रोस्ट, म्हणून आता नेटकरी म्हणतात... 'Karma is Back!', अटकेनंतर 'तो'व्हिडिओ होतोय व्हायरल