Salman Khan In Dabang 4 :  यंदाच्या ईदच्या दिवशी सलमान खान (Salman Khan) रुपेरी पडद्यावर झळकणार नसला तरी  सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी ईदच्या दिवशी सलमान खान रुपेरी पडद्यावर धमाल उडवून देण्यास सज्ज आहे. सलमानचा भाऊ निर्माता-दिग्दर्शक अरबाज खान याने दबंग-4 चित्रपटाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. अरबाजने दंबग 4 चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे म्हटले होते. याआधी निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी दंबग-4 बद्दल माहिती दिली होती. 


अॅटली कुमार दिग्दर्शन करणार?


सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान 'दबंग 4'साठी 'जवान'चा दिग्दर्शक ॲटली कुमारला भेटले असल्याची चर्चा होती. मात्र, मिड-डे सोबत बोलताना अरबाज खानने अशी कोणतीच भेट झाली नसल्याचे म्हटले. मी ॲटलीला कधीही भेटलो नसल्याचे त्याने म्हटले. जोपर्यंत आम्ही कोणतीही माहिती देत नाही, तोपर्यंत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही अरबाजने म्हटले. 


सलमान खानही तयार


दबंग 4 बाबत अरबाज खानने अपडेट देताना म्हटले की, सलमान खानदेखील उत्सुक आहे. सलमान खानदेखील रुपेरी पडद्यावर चुलबुल पांडेची व्यक्तीरेखा साकारण्यास उत्सुक असल्यास त्याने म्हटले. योग्य वेळी या चित्रपटाची घोषणा होईल आणि चित्रीकरणासही सुरुवात होईल असेही अरबाजने म्हटले. 


'दबंग 4'चे दिग्दर्शक कोण करणार?


2010 साली दंबग प्रदर्शित झाला होता. दबंगच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. सोनाक्षी सिन्हाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी 41 कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, यावर अरबाजने म्हटले केली, सध्या तरी काहीच ठरलं नाही. त्यामुळे घाईत काही बोलणं योग्य ठरणार नाही. 






सलमान खानचे आगामी चित्रपट


'दबंग 4' व्यतिरिक्त सलमान खानची सध्या शाहरुख खानसोबत 'टायगर व्हर्सेस पठाण' आहे. याशिवाय करण जोहरसोबतचा 'द बुल' हा त्याचा चित्रपट आहे, ज्यामध्ये तो आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अलीकडेच साजिद नाडियादवालासोबतच्या एका नवीन चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली. याचे दिग्दर्शन एआर मुरुगदास करणार आहेत. हा चित्रपट 'किक २' असेल असे समजते.