Sanjay Dutt Whiskey Brand Glenwalk: बॉलिवूडचा (Bollywood News) खलनायक कोण? असं विचारलं की, एकच नाव आपल्या ओठी येतं. ते म्हणजे, संजय दत्त आणि चाहत्यांचा लाडका संजू बाबा. अभिनेता संजय दत्तनं (Actor Sunjay Dutt) सिनेसृष्टी गाजवलीच, पण त्यासोबतच तो व्यावसाय जगतातही नाव कमावतोय. संजू बाबाच्या ब्रँडची हवा फक्त भारतातच नाहीतर, संपूर्म जगभरात पसरली आहे. सह-संस्थापक स्कॉच व्हिस्की ब्रँड 'द ग्लेनवॉक' (Scotch Whisky Brand 'The Glenwalk') ने अवघ्या चार महिन्यांत संपूर्ण भारतात 10 लाखांहून अधिक बाटल्या विकून खळबळ उडवून दिली आहे.

Continues below advertisement

बॉलिवूडचा संजू बाबा, म्हणजेच संजय दत्त, चित्रपटांमध्ये जितका मोठा स्टार आहे, तितकाच त्याचा बिझनेसवर्ल्डमध्येही दबदबा आहे. त्याचा को-फाऊंड स्कॉच व्हिस्की ब्रँड 'द ग्लेनवॉक'नं अवघ्या चार महिन्यांत संपूर्ण भारतात 10 लाखांहून अधिक बाटल्या विकून खळबळ उडवून दिली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, हे गेल्या वर्षीच्या विक्रीच्या पाचपट आहे. 2024 मध्ये, याच काळात 200,000 बाटल्या विकल्या गेलेल्या. या वर्षीच्या विक्रीनं विक्रम मोडला आहे. हा आकडा सप्टेंबर महिन्याचा आहे.

संजू बाबाच्या स्कॉचमध्ये एवढ काय आहे खास? 

फॉर्च्यून इंडियाच्या मते, 'द ग्लेनवॉक'  Cartel Bros नं तयार केलेली स्कॉच व्हिस्की आहे. ज्यामध्ये संजय दत्त, मोक्ष सानी, जितिन मेरानी, ​​रोहन निहलानी आणि मनीष सानी यांच्या को-फाउंडर्स आहेत. ही एक प्रीमियम ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की आहे, जी स्कॉटलंडमध्ये तीन वर्षांपासून जुनी आहे आणि जगातील टॉप 3 व्हिस्की मॅन्युफॅक्चरर्सपैकी एकानं उत्पादित केली आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे, उत्तम क्वॉलिटी, स्मूद फ्लेवर्स आणि किफायतशीर किमती... म्हणूनच ही व्हिस्की वेगाने लोकप्रिय होत आहे. संजय दत्त यांनी या यशाबद्दल भाष्य करताना म्हटलंय की, 'द ग्लेनवॉक'ची ग्रोथ, मोटिवेट करणारी आहे. अनेक ब्रँड्सना जे साध्य करायला दशकं लागतात, ते संजू बाबाच्या ब्रँडनं फक्त दोनच वर्षात साध्य केलंय. मेहनत आणि प्रोडक्टच्या क्वालिटीनं हा टप्पा गाठला आहे. 

Continues below advertisement

देशासह जगभरातही 'द ग्लेनवॉक'ची चर्चा

दोन वर्षांपूर्वी लाँच झालेला हा ब्रँड आता 15 भारतीय राज्यांमध्ये आणि चार आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युएई मध्ये ही विस्की उपलब्ध आहे. भारतातील त्याची सर्वात मोठी बाजारपेठ महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडू आहे. या ब्रँडनं 30 हून अधिक डिस्ट्रीब्यूटर्ससोबत पार्टनरशिप केली आहे आणि आता 10,000 हून अधिक रिटेल आउटलेट्स आणि 24 ड्युटी-फ्री स्टोअर्समध्ये विकली जाते. याव्यतिरिक्त, 'द ग्लेनवॉक'नं 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय व्हिस्की अवॉर्ड्स आणि कित्येक बिजनेस ऑनर्स जिंकले आहेत. कंपनी लवकरच दोन नवीन रेंज 5-ईयर-ओल्ड आणि ईयर-ओल्ड एक्सप्रेशन्स लाँच करणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Struggle Life Story: वडील 'सुपरस्टार', 500 फिल्म्स केल्या, पण मुलगा ठरला 'सुपरफ्लॉप'; चार फिल्म्सनंतरच इंडस्ट्रीला म्हणाला टाटा-बाय बाय...