Bollywood Actor Struggle Life Story: बॉलिवूडमधील (Bollywood News) अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी रुपेरी पडदा गाजवून सोडला... पण त्यांच्या मुलांनी मात्र, सिनेसृष्टीत न येता वेगळा मार्ग निवडला. स्टारकीड्सपैकी मोजक्या काहींनी इंडस्ट्रीत नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला, पण हाती यश काही आलं नाही. आज आम्ही अशाच एका बाप-लेकाच्या जोडीबाबत सांगणार आहोत. वडील एवढे सुपरस्टार की, तब्बल 500 फिल्म्समध्ये काम केलं, पण मुलानं फक्त चार फिल्म्स करुन इंडस्ट्री सोडली. सुपरस्टार वडील आणि इंडस्ट्रीत सुपरफ्लॉप ठरलेल्या बाप-लेकाच्या जोडीबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
ऐंशीच्या दशकातील काही मोजक्या खुंखार खलनायकांमध्ये समाविष्ट होणारं नाव म्हणजे, कमल कपूर (Kamal Kapoor). त्या काळात त्यांनी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातलेला. फक्त डोळ्यांनी हा खलनायक पडद्यावरच्या हिरोला घाबरवायचा आणि पडद्यावर त्याला पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही. कपूर खानदानातील कमल कपूर यांना आपल्या खलनायकी भूमिकांनी इंडस्ट्रीवर जादू केलेली. त्यांच्या खलनायकाच्या भूमिका आजही लक्षात आहेत. कमल कपूर म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक, पण मुलाला मात्र इंडस्ट्रीत नाव कमावता आलं नाही. त्यांच्या मुलाला कमल कपूर यांनी जेवढी प्रसिद्धी मिळाली, तेवढी मिळाली नाही... कमल कपूर यांच्या मुलानं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण केवळ चार चित्रपटांनंतर त्यानं चित्रपटसृष्टीला टाटा-बाय बाय म्हटलं.
कमल कपूर यांचा मुलगा कोण?
कमल कपूर यांच्या मुलाचं नाव कपिल कपूर. त्यांच्या वडिलांप्रमाणेच कपिल यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि इंडस्ट्रीत प्रवेश केला... पण जे यश वडिलांना मिळालं, ते कपिल कपूर यांच्या नशीबी आलं नाही. कपिल यांनी अभिनेता म्हणून नव्हे तर, दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि काही चित्रपटांमध्येही काम केलं. त्यांनी एकूण चार चित्रपटांमध्ये काम केलं, त्यापैकी दोन चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतः काम केलं. या चार चित्रपटांमध्ये 'खेल खेल में' (1977), 'ये वादा रहा' (1982), 'पुकार' (1983) आणि 'चोर पे मोर' (1992) यांचा समावेश आहे. कपिल कपूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द फ्लॉप ठरली आणि या चारही फ्लॉप चित्रपटांनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली, पण नंतर काही टेलिव्हिजन शोची निर्मिती केली.
कमल कपूर यांनी केलेल्या 500 फिल्म्स
कपिल कपूर यांना काही यश गवसलं नाही, मात्र त्यांच्या वडिलांच्या पायाशी यश लोळण घेत होतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कमल कपूर यांनी तब्बल 500 सिनेमांमधून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी रुपेरी पडद्यावर कधी विलन साकारला, तर कधी पोलीस ऑफिसरची भूमिका निभावली. जुन्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या सर्व भूमिका आजही सर्वांना आठवतात. कमल कपूर यांचं 2010 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. कमल कपूर हे अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे पती गोल्डी बहल यांचे आजोबा आहेत. ते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे चुलत भाऊ आणि रणबीर कपूर यांचे पणजोबा होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :