Shashi Tharoor Reacts On Paid Review Allegations: ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर (Congress Leader Shashi Tharoor) यांनी अलिकडेच सोशल मीडियावर आर्यन खानच्या (Aaryan Khan) 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'शोचं (Bads of Bollywood) कौतुक केलंय. पण, क्षणार्धात शशी थरूर यांची पोस्ट व्हायरल झाली आणि त्यांच्यावर 'पेड रिव्ह्यू' असल्याचा आरोप होऊ लागलाय. अशातच आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं त्याच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे. दरम्यान, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' पाहिल्यानंतर शशी थरूर यांनी आर्यन खान आणि सुपरस्टार शाहरुख खानसाठी ट्विटरवर एक नोट लिहिलेली. शशी थरूर यांनी आर्यन खानच्या दिग्दर्शनात डेब्यू असलेल्या नेटफ्लिक्स सीरिजला पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलेला.
शशी थरूर यांच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांच्या पोस्टवर 'पेड रिव्ह्यू' अशा कमेंट केलेल्या. एका युजरनं तर शशी थरूर यांना टोमणा मारला आणि म्हटलं की, "शशी थरूर यांचा नवा साइड बिझनेस - पेड रिव्ह्यू..." शशी थरूर यांनी युजरच्या या कमेंटला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. थरूर यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी ट्विटरवर लिहिलंय की, "मी विकला गेलो नाहीय, माझ्या मित्रा... माझ्या कोणत्याही मतासाठी कोणीही कधीही पैसे दिले नाहीत, मग ते रोख स्वरूपात असो किंवा वस्तू स्वरूपात..."
शशी थरूर आर्यन खानच्या सीरिजबाबत काय म्हणालेले?
शशी थरूर यांनी आर्यन खानच्या शोला 'अॅब्सोल्युट ओटीटी गोल्ड' म्हटलेलं. थरूर यांनी लिहिलेलं की, "मी गेल्या दोन दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याशी झुंजतोय आणि अनेक कार्यक्रम रद्द करतोय... माझी स्टाफ आणि माझी बहीण @smitatharoor यांनी मला कम्प्युटरवरुन लक्ष हटवून @NetflixIndia सीरिज पाहण्यासाठी मनवलं... आणि हे माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे... परिपूर्ण #OTT गोल्ड..."
थरूर पुढे म्हणाले, "आर्यन खानचा दिग्दर्शनातील पहिलं दिग्दर्शन द बॅड्स ऑफ बॉलीवूड ' नुकताच पाहिला . आणि आता मला कौतुकासाठी शब्द सापडत नाहीयत . ही सिरिज सुरुवातीला हळूहळू पकड घेते, पण एकदा तुम्ही जोडले गेल्यावर तुम्हाला सोडवत नाही. धारदार लेखन, निडर दिग्दर्शन आणि संपूर्ण बॉलिवूडवर केलेला हा विनोदी व्यंग नेमक्या ठिकाणी लागतो. याची बॉलीवूडला गरज होती .प्रतिभाशाली,कधी विनोदी कधी भावनिक आणि ग्लॅमरच्या पलीकडे नेणारी नम्र नजर केवळ मनोरंजक नाही, तर विचार करायला लावणारं आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :