Bollywood Actress Sameera Reddys Marriage Sparks Social Media Buzz: बॉलिवूडमधील लग्न नेहमीच चर्चेत राहिले आहेत. साधे असोत किंवा भव्य, प्रत्येकजण एका अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा पर्याय निवडतो. दरम्यान, बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. लग्न चर्चेत असण्यामागचं कारण देखील खास होतं. त्या बॉलिवूड अभिनेत्रीचं कन्यादान चक्क उद्योगपती विजय मल्ल्या यांनी केलं होतं. ऐकून थक्क झालात ना? पण हे खरं आहे. समीरा रेड्डी असे बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव. तिनं 21 जानेवारी 2014 रोजी विवाह केला होता. पारंपारिक रितीरिवाजांनुसार, तिनं अक्षय वर्देशी पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले होते. 2014 साली समीरा रेड्डीच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.
समीराचे कन्यादान विजय मल्ल्याने केले होते
उद्योगपती विजय मल्ल्या अनेकदा वादात अडकले आहेत. पण एक काळ असा होता की, ते आपल्या लाइफस्टाइल, किंगफिशल एअरलाइन्स, पार्ट्या आणि ग्लॅमरससाठी ओळखले जात होते. त्यांनी 2014 साली समीरा रेड्डीच्या लग्नात हजेरी लावली होती. या लग्नात विजय मल्ल्या यांनी समीराचे कन्यादान केले. समीराने डीएनलएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आमचे एप्रिल 2014मध्ये लग्न होणार होते. परंतु , काही कारणास्तव लग्न पुढे ढकलावे लागले". या मुलाखतीत समीराने उघड केले की, लग्नात तिचे कन्यादान विजय मुल्ल्याने केले होते. जे समीराच्या आईच्या बाजूने विधी करणारे एकमेव नातेवाईक होते.
समीरा रेड्डीच्या लग्नाची चर्चा
समीरा रेड्डीने केलेल्या खुलाशामुळे अनेकांच्या भुवया उचांवल्या होत्या. विजय मल्ल्या यांनी समीरा रेड्डीचे कन्यादान केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला. सध्या समीरा रेड्डीची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
समीरा रेड्डी सिनेसृष्टीपासून दूर
समीरा रेड्डीने आता अभिनयापासून स्वत:ला दूर केले आहे. सध्या ती तिच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत आहे. दरम्यान, समीरा रेड्डी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत पोस्ट शेअर करत असते. ती तिच्या चाहत्यांसोबत कनेक्टेड असते. ती आपल्या व्यायामाचे आणि फॅमिलीसोबत घालवलेले क्षण सोशल मीडियात शेअर करते. सध्या समीरा रेड्डी मुलाखतीमुळे चर्चेत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या बंधूंचे निधन; मृत्यू नेमका कशामुळे झाला? कुटुंबानं सांगितलं कारण