Aadesh Bandekar: अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाचं काही दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात लग्न झालं. या दोघांच्याही लग्नाची सोशल मीडियासह सगळीकडेच जोरदार चर्चाही झाली. त्यांची लग्नातील धमाल पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. 2 डिसेंबर 2025 रोजी सोहम बांदेकर (Soham Bandekar) आणि पूजा बिरारी (Puja Birari) विवाह बंधनात अडकले.पूजा-सोहमच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्यापासून ते नेमके कुठे भेटले? त्यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? याबद्दल चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर लग्नानंतर दोघांनीही एकत्र त्यांची पहिली मुलाखत दिली आहे. ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.
आदेश बांदेकरांचा सोहमला थेट मेसेज
सोहमने नुकताच दिलेल्या या मुलाखतीत आपल्या लग्नाआधीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यांना सांगितलं' पूजाबद्दल प्रेम तर होतं पण थोडा साशंक होतो. तोपर्यंत आजी मावशी या सगळ्या मला सुचवत होत्या की ही मुलगी खूप छान आहे. पण तेव्हा आदेश बांदेकरांचा म्हणजेच त्याच्या बाबांचा त्याला एक दिवस मेसेज आला की 'तू मर्द असशील तर तिच्याकडून होकार मिळवशील' मी म्हणला रे बाबा तू काय बोलतोस... तो म्हणाला' मुलगी चांगली आहे तुझ्या टेंटेटिव्हनेसमध्ये तू तिला घालवू नकोस. सोहमला आधी वाटलं की बाबा मस्करी करतात पण ते खरंच सिरीयस होते. माझी आजी आणि मावशी ही आमची मालिका पाहून मला सांगायच्या, ‘ही जरा बघ हा…किती छान आहे बघ’.
पाणीपुरी खायला गेलो आणि....
सोहमने पुढे सांगितलं, ' मी सोशल मीडियावर एक सीरिज सुरू केली होती, कोणत्या परिसरात काय खायला छान मिळतं अशी... असंच एकदा मी रामेन बाउलचा फोटो शेअर केला होता. तेव्हा हिचा मेसेज आला…’ही जागा कुठे आहे?’ मग मी तिला सगळी माहिती दिली. त्यानंतर अजून एकदा तिने स्टोरीवर रिप्लाय केला होता. याशिवाय आईला सुद्धा एकाने सांगितलं होतं की, ‘ही खूप चांगली मुलगी आहे, पाठांतर खूप छान असतं.’ मग हळुहळू आमचं बोलणं सुरू झालं आणि मला समजलं की, तिला पाणीपुरी खूप आवडते.मी तिला म्हणालो, मला भेटशील का? मी तुला उत्तम पाणीपुरी खायला घेऊन जातो. तू कधीही खाल्ली नसशील अशी पाणीपुरी खाण्यासाठी मी तिला ठाण्याला घेऊन गेलो. आणि मग जाणवलं की आर आपला स्वभाव खूप सारखा आहे.
जेवता जेवता लग्नाची तारीख फिक्स
एकदा सोहमने पूजाला कानातले गिफ्ट केले होते. त्या दोघांचा फोटो त्याने आदेश बंद करांनाही फॉरवर्ड केलं होतं. तो फोटो पाहून सगळ्यांनाच कळलं की सुनबाई घरी यायला तयार आहेत. घरच्यांना भेटायला येताना पूजन ते खास कानातलेही घातले होते. लग्नाची तारीख कशी ठरली यावर पूजाने सांगितलं की आम्ही सगळे मिळून जेवायला गेलो होतो. गप्पांचा विषय हळूहळू लग्नाकडे वळाला आणि चर्चा करता करता लग्नाची तारीख ही फिक्स झाली. आम्हाला कळलच नाही की आमचं लग्न कधी ठरलं.'