Hemant Dhole Appeal to Vote in BMC Election: अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष मागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. अनेक दिग्गजांनी सकाळी लवकर मतदान करत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन केलं आहे. दुसरीकडे मतदार मतदानासाठी बाहेर पडले असतानाच निवडणूक आयोगाचा घोळ सुद्धा दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव न सापडणं, एकाच कुटुंबातील नाव दोन-तीन ठिकाणी असणं, ईव्हीएम बंद पडणं अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, मुंबईमध्ये सुद्धा मतदान आज सकाळपासूनच होत आहे. सचिन तेंडुलकरने सकाळीच सहकुटुंब मतदान करत मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे मराठी कलाकारांकडून सुद्धा मतदान होताच मतदान अधिकार बजावण्यासाठी आवाहन केलं जात आहे. 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सुद्धा मतदानाचा अधिकार बजावत मराठी माणसाला मतदानासाठी भावनिक आवाहन केलं.
हेमंत ढोमेनं मतदानाचा सेल्फी शेअर करत ट्विट केलं आहे. मराठी माणसासाठी! ‘महाराष्ट्राच्या’ मुंबईसाठी! सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा. 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका! असे नमूद केलं आहे.
गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा
दुसरीकडे, अभिनेत्री जिगना त्रिवेदीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य केलं आहे. ती म्हणाली," नमस्कार महाराष्ट्र. कसे आहात. महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मतदान करायला तयार आहात का? एक सांगते, जेव्हा आपण सारे कपडे विकत घ्यायला जातो तेव्हा आपण विचार करतो. बाईने जर दोन-तीन दिवस भांडी नाही घासली तर तिच्याकडे तक्रार करतो. मग आता आपलं महाराष्ट्र राज्य पुढच्या पाच वर्षात कोणाच्या हातात द्यायचा आहे याचा निर्णय घेण्याची संधी आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. मुंबई हे विकसित शहर होतच. त्यामुळे गेलं कित्येक वर्षांपासून लोक इथे काम करायला येतात. त्यामुळे केवळ मुंबई विकसित करून चालणार नाही. ग्रामीण भागातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासाकडे बघा. विकास हा महत्त्वाचा आहेच. पण आपल्याला असा विकास नकोय जिथे आपला श्वास गुदमरेल. आपली पुढची पिढी शारीरिकदृष्ट्या कमकुवत निघेल. आपल्यासमोर कितीतरी डोळे उघडणारा वास्तव आणि फॅक्ट्स आहेत. त्याच्याकडे बघा. " ती पुढे म्हणाली," मुंबई आता संधी आणि वेळ दोन्ही आहेत. आता तुमची चॉईस कोण चांगलं किंवा वाईट यामध्ये नाही. तर कोण कमी वाईट आहे आणि कोण जास्त वाईट आहे याच्यात आहे. आता आपला महाराष्ट्र खऱ्या राजाच्या हातात द्यायची संधी आहे. ही संधी चुकवू नये. जय महाराष्ट्र." जिगना त्रिवेदी एक लोकप्रिय गुजराती अभिनेत्री आहे. जिगनाचे अनेक गुजराती नाटक आणि सिनेमे गाजले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या