मुंबई : दहावीचे निकाल (SSC Exam Result) जाहीर होत असताना राज्यातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (FYJC Admission ) सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. मुंबई विभागातील (Mumbai Division ) अकरावी प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये नऊ विद्यार्थ्यी शंभर टक्के असणार आहेत. मुंबई विभागात अकरावीमध्ये प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या सर्वांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई विभागातील जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीनुसार 2 लाख 47 हजार 664 जागांसाठी 2 लाख 38 हजार 953 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची सामान्य गुणवत्ता यादी 27 जूनला जारी होणार आहे.
मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची पसंती वाणिज्य शाखेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेसाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ 93 हजार 895 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली आहे. कला शाखेसाठी केवळ 20429 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होणार आहे. पहिली सामान्य फेरी, त्यानंतर विशेष फेरीतून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.
तात्पुतरत्या गुणवत्ता यादीतील माहितीनुसार 54 टक्के विद्यार्थी हे 99 ते 99.99 टक्के गुण मिळवणारे आहेत. 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 60 ते 79.99 गुण आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2 लाख 34 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयसीएसईच्या 13837 तर सीबीएसईच्या 10858 च्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील माहिती आणि अचूकता तपासून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत दुरुस्तीसाठी विनंती करण्याच्या सूचन देण्यात आलेल्या आहेत.
मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीमध्ये केंद्रीय प्रवेश प्रकियेद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मुंबईतील अकरावीच्या एकूण जागांपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दुसरीकडे मुंबईतील विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान आणि कला शाखेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक आहे. आपल्या मुलांना वाणिज्य शाखेतून शिक्षण देण्यासाठी मुंबईतील बहुतांश पालक आग्रही असल्याचं चित्र आहे. वाणिज्य शाखेपाठोपाठ विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला पसंती आहे. सर्वात कमी प्रतिसाद कला शाखेला मिळत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या :
पोलीस भरतीच्या 2 लाख उमेदवारांची व्यथा, मनोज जरागेंना मंत्र्यांचा फोन; शंभूराज देसाईंकडून आश्वासन
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI