Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या सिने क्षेत्रातील कामाबरोबरच व्यक्तीगत जीवनामुळेही चर्चेत राहिली आहे. नुकतीच समंथा 'आस्क मी एनीथिंग' या सेशनमध्ये सहभागी झाली होती. यावेळी चाहत्यांनी समंथाला (Samantha Ruth Prabhu) अनेक प्रश्न विचारले. या वेळी एका चाहत्याने समंथाला आयुष्यात सर्वांत मोठी चूक कोणती केली? असा सवाल विचारला होता. अभिनेत्री समंथाने (Samantha Ruth Prabhu) या प्रश्नाचे उत्तर देताना मोठे खुलासे केले आहेत. 


नागा चैतन्यच्या प्रेमात पडून सर्वांत मोठी चूक केली?


'आस्क मी एनीथिंग' या सेशनदरम्यान चाहत्यानी समंथाला अनेक प्रश्न विचारले होते. तू आयुष्यात कोणती सर्वांत मोठी चूक केली? ज्यातून तूला शिकायला मिळालं? असा सवाल एका चाहत्याने समंथाला (Samantha Ruth Prabhu) विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना समंथा म्हणाली, "माझी सर्वांत मोठी चूक म्हणजे माझी आवड आणि नापसंती..हे मला योग्यरित्या समजता आले नाही. मी काळापूर्वी माझ्या साथीदाराशी जास्तच आकर्षित झाले होते. मात्र, काही काळानंतर मला माझी चूक समजली. त्या कठीण प्रसंगातून मला बरच काही शिकायला मिळाले." समंथाचे हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने (Samantha Ruth Prabhu) तिच्या घटस्फोटीत पती नागा चैतन्य बाबतचं भाष्य केले, असा दावा चाहत्यांकडून  केला जातोय. 


2017 मध्ये केला होता नागा चैतन्यशी (Naga Chaitanya)विवाह 


समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांची भेट 'ये माया चेसवा' या सिनेमाच्या शूटींगदरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. दोघे एकमेकांना अनेक महिने डेट करत होते. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये त्यांनी लगीनगाठ बांधली. मात्र, विवाह झाल्यानंतर त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. ऑक्टोंबर 2021 मध्ये त्यांनी "आम्ही वेगळे होत आहोत", अशी घोषणा केली.


पुष्पा (Pushpa) चित्रपटातील 'ऊ अंटवा' गाण्यावरील तिचा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. गेल्या वर्षी तिला मायोसिटिस (Myositis)या दुर्मिळ आजाराने गाठलं होतं. याबाबतची माहिती तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली होती. समंथाने 'ईगा', द फॅमिली मॅन २ यांसारख्या चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


VIDEO: "मावळ आम्ही वादळ आम्ही" ते "काय सांगू राणी मला गाव सुटना"; टांझानियाच्या किली पॉलचा मराठमोळा अंदाज, एकदा व्हिडीओ पाहाच!