Salman Khan Security Increased : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे. सिद्धू मुसेवाला यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता त्यांच्या हत्येनंतर  मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.  सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडच्या प्राथमिक तापासात लॉरेन्स बिश्नोई याचे नाव समोर येत आहे. त्यामुळे आता सलमानची सुरक्षा वाढवण्यात येत आहे. 

Continues below advertisement

एका मुलाखतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, 'आम्ही सलमान खानच्या एकूण सुरक्षेत वाढ केली आहे. राजस्थानच्या टोळीकडून कोणतेही कृत्ये होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी पोलीस सलमान खानच्या अपार्टमेंटभोवती उपस्थित राहतील'

लॉरेन्स बिश्नोईनं दिली होती धमकी

Continues below advertisement

रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईने काळवीट शिकार प्रकरणामुळे सलमान खानला ठार मारण्याची योजना जोधपुर येथे आखली होती. लॉरेन्स बिश्नोई 2018 मध्ये  कोर्टाबाहेर म्हणाला होता की,“आम्ही सलमान खानला मारून टाकू,”.तेव्हा बिष्णोई म्हणाला, 'आम्ही कारवाई केली की सर्वांना कळेल. मी अजून काही केले नाही, ते विनाकारण माझ्यावर आरोप लावत आहेत.' 

सेलिब्रिटींकडून शोक व्यक्तबॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.  शहनाज गिल, भगवंत मान आणि करण कुंद्रा या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. 

संबंधित बातम्या