Salman Khan Starrer Battle of Galwan Delayed: सलमान खान अभिनीत 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटातून सलमानचा एक वेगळा अंदाज सर्वांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सलमान खानसह चित्रांगदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा सिनेमा आधी 17 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. दरम्यान, हा चित्रपट आता 14 ऑगस्ट 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पुढे ढकलण्याची विविध कारणे सांगितले जात आहे. दरम्यान, सलमानच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
अपूर्व लाखिया दिग्दर्शित बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. काही वृत्तानुसार, या चित्रपटाची स्क्रीनिंग आधी डिफेन्स मिनिस्ट्रीसाठी ठेवण्यात येईल. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जाईल. बॉलिवूड हंगामाने सुत्राच्या हवाल्याने म्हटले की, हा देशभक्तीपर आधारीत चित्रपट असल्याने 15 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शित करण्यात येईल.
सलमान खान अभिनीत 'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. सलमान खान आणि निर्मात्यांना असे वाटते की, ही तारीख योग्य राहिल. कारण भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. या कारणामुळे लोकांमध्ये अधिक देशभक्तीची भावना निर्माण होईल. निर्माते लवकरच अधिकृतपणे नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील', अशी माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप बाकी असल्याचं वृत्त आहे. काही सीन्स हे रीशूट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत या सिनेमाची शुटिंग पूर्ण होऊ शकते. रिशूट केलेले भाग पुन्हा एडिट केले जातील. डायरेक्टर एडिटिंग करतील, अशी माहिती आहे.
'बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चिनी सैनिकांमधील संघर्षावर आधारीत आहे. या लढाईत एकूण 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
टीव्ही क्विन एकता कपूर अजूनही अविवाहित; लग्न न करण्यामागचं कारण काय? स्वत:च केला मोठा खुलासा