Kolhapur ZP Panchayat Samiti Election Result:कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांच्या गटाच्या कागल तालुक्यातील सर्व उमेदवारांनी विजय मिळवला. पंचायत समितीच्या देखील 11 जागांवरती विजय मिळवला. माजी खासदार संजय मंडलिक यांच्या वाट्याला अवघी एक पंचायत समिती आल्याने संजय मंडलिक गटाचं कागल तालुक्यांमध्ये पानिपत झाल्याचे चित्र आहे. गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांनी वर्चस्व कायम राखलं आहे. तिसंगी झेडपी गटातून सोनाली पाटील यांनी विजय मिळवला. 

शितल फराकटे यांना पराभवाचा धक्का

दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर हसन मुश्रीफ यांच्या कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर आम्ही फक्त हाती झेंडा घ्यायचा का? फक्त नारेबाजीच करायची का? असं म्हणत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. या मतदारसंघातून शोभाताई फराकटे यांनी शीतल फराकटे यांचा पराभव केला. दुसरीकडे, भादोले झे़डपी मतदार संघामध्ये शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळालेल्या सोनाली सावंत यांनी विजय मिळवला आहे. त्या रिल स्टार म्हणून परिचित आहेत. 

शाहुवाडी तालुका

१. शित्तूर तर्फ वारूण -  २. सरूड  ३. बांबवडे - राजकुंवर गायकवाड ४. आंबार्डे -  

पन्हाळा तालुका 

५. सातवे -  डाॅ. जयंत पाटील ६. कोडोली -  अमरसिंह पाटील ७. पोर्ले तर्फ ठाणे -  ८. यवलूज -  ९. कोतोली-  १०. कळे 

हातकणंगले तालुका

११. घुणकी  - शुभांगी महेश कुंभार१२. भादोले-  सोनाली सावंत १३. कुंभोज - शीतल यादव १४. आळते - १५. शिरोली पुलाची - सलीम महात १६. रूकडी-  १७. रूई - १८. कोरोची- १९. कबनूर - २०. पट्टणकोडोली - २१. रेंदाळ -  

शिरोळ तालुका

२२. दानोळी २३. उदगांव - अमोल चव्हाण २४. आलास -  प्रशांत शहापुरे२५. नांदणी -  २६. यड्राव -  अर्चना अमोल चौगुले२७. अब्दूललाट - २८. दत्तवाड -  बंडू चौगुले

कागल तालुका

२९. कसबा सांगाव - सुवर्णा कांबळे ३०. सिद्धनेर्ली - सुयशा घाटगे ३१. बोरवडे- शोभाताई फराकटे३२. म्हाकवे - काकासाहेब सावडकर ३३. चिखली - शिवानी भोसले३४. कापशी - शिल्पा खोत 

करवीर तालुका

३५. शिये -हामू पाटील ३६. वडणगे - इंद्रजित पाटील ३७. उचगांव -  नामदेव वाईंगडे३८. मुडशिंगी -  तानाजी पाटील३९. गोकुळ शिरगांव-  सुदर्शन खोत ४०. पाचगांव -  संग्राम पाटील ४१. कळंबे तर्फ ठाणे-  ४२. पाडळी खुर्द-  ४३. शिंगणापूर -  ४४. सांगरूळ  ४५. सडोली खालसा ४६. निगवे खालसा 

गगनबावडा तालुका 

४७. तिसंगी खुला - सोनाली पाटील४८. असळज - संभाजी पाटणकर 

राधानगरी तालुका

४९. राशिवडे बुद्रु‌क -  ५०. कसबा तारळे -  अमृता डोंगळे ५१. कसबा वाळवे  ५२. सरवडे -  ५३. राधानगरी -  

भुदरगड तालुका

५४. गारगोटी ५५. पिंपळगांव - रोहिणी आबिटकर  ५६. आकुर्डे - अर्चना निकम ५७. कडगांव - सारिका नांदेकर 

आजरा तालुका

५८. उत्तूर-  ५९. पेरणोली -  

गडहिंग्लज तालुका 

६०. कसबा नूल -  अनिरुद्ध रेडेकर ६१. हलकर्णी - 

६२. भडगाव - ६३. गिजवणे ६४. नेसरी 

चंदगड तालुका 

६५. आडकूर ६६. माणंगाव -  ६७. कुदनूर -  ६८. तुडये

इतर महत्वाच्या बातम्या