Dharashiv zp election result: राज्यभरातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल समोर येत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती निवडणुकीत एका मताने झालेल्या विजयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ढोकी पंचायत समितीतून ठाकरे गटाने अवघ्या एका मताने विजय मिळवलाय. ठाकरे गटाचे अमर समुद्रे यांना 3187 मते मिळाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान ढोकी पंचायत समितीच्या मतमोजणी दरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळाली. (Dharashi ZP Election Result)

Continues below advertisement

एका मताने ठाकरे गटाचा उमेदवार विजयी

ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे आणि भाजपचे उमेदवार निहाल काझी यांच्यात थेट सामना होता. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत दोघांच्याही मताची तफावत ही अत्यंत कमी होती. अखेर शेवटच्या फेरीत निकाल स्पष्ट झाला आणि अमर समुद्र यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवला. ठाकरे गटाचे अमर समुद्र यांना 3187 मते मिळाली. तर भाजपचे निहाल काझी यांना 3186 मते मिळाली. केवळ एका मताच्या फरकाने ठाकरे गटाने हा विजय खेचून आणला आहे. निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

दुसरीकडे, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत 2187 मतांनी विजयी झाले आहेत. परंडा तालुक्यातील जवळा गटातून बंडखोरी करत अपक्ष लढवली होती निवडणूक, धनंजय सावंत यांना भाजपने पाठिंबा दिला होता. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे विजयी झाले. धनंजय सावंत यांनी बंड करून भूम, परंडा, वाशी मतदार संघात जागा लढवल्या आहेत. भूम परंडा वाशी आमदार तानाजी सावंत यांचा मतदारसंघ आहे. धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये धनंजय सावंत यांची ही  लढत होती .

Continues below advertisement

माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. भाजप आणदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केला होता. जवळा गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सांवत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर  भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत होत्या.