Salman Khan Transformation For Movie Battle Of Galwan: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला. यामध्ये सलमान खानचं वजन फार (Weight Loss Diet Of Salman Khan) कमी झाल्याचं दिसत होतं. तेव्हापासूनच चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. सलमान खान आजही अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या सलमान खानशी लग्न करायला आजही अनेकजणी तयार आहेत, अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्या आहेत. पण, त्याच्या समोर आलेल्या लूकनं सर्वांना त्याची काळजी लागून राहिली आहे. सलमानचं अचानक वजन घटल्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. तर, तो आजारी तर नाही ना? अशी काळजीही अनेकांना वाटतेय. पण, सलमान खान अजिबात आजारी वैगरे नाही, तर सलमाननं त्याच्या आगामी सिनेमासाठी ट्रान्सफॉर्मेशन (Salman Khan Transformation) केलं आहे. 

Continues below advertisement


सलमान खान त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) चित्रपटासाठी खूप मेहनत घेतोय. त्याच्या नव्या फोटोंमध्ये तुम्ही त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सहज पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला सलमानच्या कोणत्याही नव्या फोटोबद्दल सांगणार नाही, तर या सिनेमातल्या भूमिकेसाठी तो करत असलेल्या कठोर परिश्रमांबाबत सांगणार आहोत. एकीकडे, वर्षाच्या सुरुवातीला वँकूवरमध्ये (Vancouver) झालेल्या एका कार्यक्रमात फिटनेसमुळे त्याला झालेल्या बॉडी शेमिंगनंतर, आता सलमानचा जो अवतार समोर येत आहे, तो खरंच कौतुकास्पद आहे.  






मिड-डे वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय की, सलमान खान त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी अतिशय स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करतोय, ज्यामध्ये तो एका सैनिकाची भूमिका साकारणार आहे. एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, "तो हाय-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंगसह व्हॉल्यूम सेट देखील करत आहे, जिथे तो आठवड्यातून सहा दिवस, प्रत्येक सेशनमध्ये एक-एका मसल ग्रुपवर फोकस करत आहेत."


सुत्रांनी पुढे बोलताना सांगितलं की, "तो एसी किंवा पंख्यांशिवाय ट्रेनिंग करतो, ज्यामुळे हलकं डिहायड्रेशन होतं आणि चरबी, शरीरातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया वेगानं होते. प्रत्येक सत्र एक तास चालतं आणि त्यात प्रतिकारक व्यायाम तसेच तीव्र बाह्य कार्डिओचा समावेश असतो." पुढे बोलताना त्यानं सांगितलं की, "सलमान खानच्या डाएटमध्येही बदल करण्यात आले आहेत. भाईजानच्या आहारात घरी शिजवलेलं अन्न समाविष्ट आहे, ज्यामध्ये लीन प्रोटीन, भाज्या आणि दिवसातून फक्त एक चमचा भाताचा समावेश आहे, तर  प्रोसेस्ड कार्ब्स आणि अल्कोहोल पूर्णपणे बंद करण्यात आलंय. "त्यानं लूक टेस्ट आणि फोटोशूट पूर्ण केलंय. लडाख शेड्यूलवेळी ट्रेनिंगचा वेळ आणखी वाढवला जाईल..." असे सूत्रांनी सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aamir Khan Third Marriage: 'मी गौरीशी कधीच लग्न केलंय'; तिसऱ्या लग्नाबाबत आमिर खानचा खुलासा, म्हणाला...