Horoscope Today 10 July 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 10 जुलै 2025 चा दिवस आहे. आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस सर्व हा दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी गुरु पौर्णिमेचा (Guru Purnima) देखील शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

महिलांनी जास्तीत जास्त सकारात्मक विचार करावा ज्या प्रश्नात तुमची थोडीफार गैरसोय झालेली होती त्यात सुधारणा होईल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

एकावेळी अनेक कामे न करता तुमच्या दृष्टीने जी बाब अधिक फायदा देणारी असेल त्यावर एकाग्रता वाढवा.  

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

तुमचे कौतुक कोणी केले तर तुमच्या अवधार्‍याला सीमा राहत नाही याचा अनुभव घ्याल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज एखाद्या कामाचे नेतृत्व कराल तुमच्या आजूबाजूला बराच लोक समुदाय वावरेल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आपले वर्चस्व कायम राहिले पाहिजे आता तोंडाशी आलेल्या अनेक सुवर्णसंधी वाया जात नाही ना याकडे लक्ष द्यायला हवे.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

मन चंगा तो कटोरी में गंगा ही उक्ति लक्षात ठेवा. महिलांचा धार्मिकते कडे कल राहील.  

तूळ रास (Libra Horoscope Today)

आज विचारापेक्षा कृतीला जास्त महत्त्व द्याल त्यामुळे एखाद्या वेळी हातून अविचारही होऊ शकतो.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करा भेटला देवा दंडवत करून आपले प्रश्न सोडवून घ्या.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

बुद्धीचा आणि व्यासंगाच्या जोरावर बरीच कामे पार पाडावी परंतु बोलण्यात निश्चितपणा ठामपणा ठेवायला हवा.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

परिस्थितीचे योग्य आकलन करून घ्या. आर्थिक घरी सुधारली तरी निष्काळजीपणा आणि खर्चिक वृत्तीमुळे हातात काही शिल्लक राहणार नाही.   

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

स्वतःबद्दलच्या अवाजवी कल्पना आणि अहंकारी वृत्ती मुळे नुकसान करून घेऊ नका.

मीन रास (Pisces Horoscope Today)

प्रकृती सांभाळा आहार विहारात नियमितपणाने ठेवल्यास स्वास्थ्य बिघडेल.

हेही वाचा :                 

Guru Purnima 2025 : गुरु: साक्षात् परब्रह्म! गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश