Aamir Khan Third Marriage With Gauri : बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याचे दोन घटस्फोट आणि तिसरं लव्ह अफेअर यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खाननं माध्यमांना त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटची (Gauri Spratt) ओळख करुन दिली. तेव्हापासूनच गौरी सगळीकडे आमिर खानसोबत दिसतेय. अशातच आमिर खाननं गौरीची सर्वांशी ओळख केल्यापासूनच चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे, आमिरच्या लग्नाची... आता साठीला टेकलेला आमिर खान तिसऱ्यांदा गौरीसोबत बोहोल्यावर चढणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करुन बसला आहे. आमिर खाननं स्वतः या मुद्द्याला हात घातला असून गौरी स्प्रॅटशी तिसऱ्यांदा लग्न केल्याचा खुलासा केला आहे.
साठीला टेकलेल्या आमिर खाननं पहिल्यांदा रीना दत्तासोबत आपली लग्नगाठ बांधली. रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर आमिर खाननं किरण रावशी लग्न केलं. पण, आमिरचं दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. आमिर आणि किरण यांनी आपसी सहमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला. आमिर खाननं स्वतः मीडियासमोर आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांना ओळख करुन दिली. तसेच, आमिरनं अनेकदा गौरीसोबत तो सीरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलंय आणि आता आमिरनं गौरीसोबत लग्न करण्याबाबत वक्तव्य केलं आहे.
आमिर म्हणाला, गौरीशी तिसरं लग्न केलंय
आमिर खाननं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गौरी स्प्रॅटबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला की, "मी आणि गौरी एकमेंकांबाबत खूपच सीरिअस आहोत... आम्ही एका कमिटेड स्पेसमध्ये आहोत. आणि तुम्हाला माहितीये, आम्ही पार्टनर्स आहोत. आम्ही एकत्र आहोत... लग्न एक अशी गोष्ट आहे की, मी गौरीशी माझ्या मनात लग्न कधीच केलंय... मग आता आम्ही हे लग्न फॉर्मलाइज करणार की, नाही... हे असं काहीतरी आहे, ज्याबाबत मी जसजसा वेळ पुढे जाईल, तसतसा निर्णय घेईन..."
आमिर खान यापूर्वीही एका मुलाखतीत गौरी स्प्रॅटसोबतच्या त्याच्या लग्नाबद्दल बोलला आहे. जेव्हा आमिर खानला गौरी स्प्रॅटसोबतच्या त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला की, मनातून तिच्यासोबत तिसरं लग्न कधीच केलंय. आता आमिर आणि गौरी खरंखुरी लग्न करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत जिनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन करतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :