Jaywant Wadkar On Swami Samarth Darshan Experience Akkalkot: श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) अनेक भक्त आहेत. अनेक सेलिब्रिटीही श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन होत असतात. कित्येकदा अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलाखतींमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दृष्टांतांचे अनेक किस्से सांगितले आहेत. तसेच, स्वामींची किर्ती किती अफाट आहे, ते कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्या मदतीला येतातच, याचे आलेले अनुभवही शेअर केले आहेत. तसेच, अडनडीच्या वेळी फक्त समर्थांचा धावा केल्यानंतरही अनेक अडचणींवर सोल्युशन मिळतं, असंही अनेक सेलिब्रिटींनी यापूर्वी सांगितलं आहे. असाच एक अनुभव मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी सांगितला आहे. वाडकरांचा हा अनुभव ऐकून अंगावर सर्रकन काटा येतो.
जयवंत वाडकरांनी नुकतीच 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिलेली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या मुलीच्या जन्मावेळीची किस्सा सांगितला. त्यांची पत्नी वयाच्या 38-39व्या वर्षी दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, त्यावेळी त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये खूपच कॉम्प्लिकेशन्स असल्याचंही त्यांनी सांगितलं. नेमकं त्याचवेळी त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थनांचं दर्शन घेतल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.
जयवंत वाडकर नेमकं काय म्हणाले?
मराठी अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले की, "ज्यावेळी माझी पत्नी दुसऱ्यांदा गरोदर होती, तेव्हा डॉक्टरांना प्रेग्नसींमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत असं सांगितलं होचं. त्यावेळी ती दर महिन्याला अक्कलकोटला दर्शनाला जायची. तेव्हा नववा महिना असताना तिने तिकडे जायची इच्छा व्यक्त केली. त्यादरम्यान, सोलापूर आल्यानंतर गाडीचा ब्रेक लागतच नव्हता. पण, कोणत्याही परिस्थितीत तिला अक्कलकोटला जाऊन आरतीला पोहाचायं होतं."
"मग कसेतरी आम्ही तिकडे पोहोचलो.अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो. त्यावेळी गाडीचा मॅकनिक आम्हाला म्हणाला, तुम्ही जवळपास 42 किलोमीटर लांबून इथे आलातच कसे? ही स्वामींची कृपा...! मला ती प्रचीती घडली. मग मी परत स्वामींकडे गेलो ढसाढसा रडलो. म्हणजे गाडीचा ब्रेक खराब झाला होता. त्यावरुन मी माझ्या मुलीचं नाव स्वामिनी ठेवलं."
दरम्यान, जयवंत वाडकर म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते. आजवर त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्यात त्यांचा हातखंडा असतो. तसेच, विनोदाचं अचून टायमिंग साधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात त्यांचा हात कुणीच धरु शकत नाही. फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, मालिकाविश्व, रंगभूमीवरही जयवंत वाडकरांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :