Samantha Rukh Prabhu, Salman Khan : अभिनेत्री समंथाचा (Samantha Ruth Prrabhu) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या नृत्यशैलीला आणि अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटामधील 'Oo Antava' या गाण्यामधील समंथाच्या डान्सनं  अनेकांची मनं जिंकली. आता या गाण्याचा बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा फॅन झाला आहे. समंथानं सलमान खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा एका मुलाखतीमध्ये  'Oo Antava' या गाण्याबद्दल सांगताना दिसत आहे. 


आयफा पुरस्कार सोहळ्याला सलमाननं हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान एका मुलाखतीमध्ये सलमानला एक प्रश्न विचारण्यात आला. ' गेल्या वर्षी रिलीज झालेल्या कोणत्या गाण्यानं तुला प्रेरणा मिळाली?' या प्रश्नाचं सलमानानं, 'Oo Antava' असं उत्तर दिलं. हा सलमानचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ रिट्वीट करुन समंथानं हटके रिअॅक्शन दिली. समंथानं सलमानचा व्हिडीओ रिट्वीट करुन कॅप्शनमध्ये तीन हार्ट इमोजींचा वापर करुन रिअॅक्शन दिली आहे. 


पाहा व्हिडीओ:




 माधुरी दीक्षित, रणवीर सिंग,आयशा सिंग, रश्मी देसाई, उमर रियाझ, मिस्टर फैसू, जॉर्जिया एंड्रियानी, उर्फी जावेद आणि नेहा कक्कर या कलाकरांनी देखील 'Oo Antava' या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.  ‘शकुंतला’,  ‘यशोदा’  हे समंथाचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच समंथा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. असंही म्हटलं जात आहे. 


पुष्पा चित्रपटातील गाण्यांना आणि चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर आता या पुष्पा द रूल पार्ट 2 हा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयकॉन आणि AA21 हे अल्लू अर्जनचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पा हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :