DIY Tips For Dandruff Removing : कोंड्यामुळे केवळ तुमचा लूक तर वाईट दिसतोच पण तुमच्या कपड्यांवर किंवा केसांमध्ये कोंडा दिसायला खराब दिसतो. हे फार वाईट ठरतं. हे आरोग्यासाठीही धोकादायक आहे. कोंडा हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास चेहरा आणि खांद्यावर मुरुम येऊ शकतात. यामुळे तुमच्या कानात खाज सुटणे किंवा कान वाहणे होऊ शकते. या समस्या टाळण्यासाठी, आपण वेळेत आपल्या टाळूवरील कोंड्यापासून सुटका करणं महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता, ते जाणून घ्या...
त्रिफळा हेअर मास्क
रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी दही घेऊन फेटून घ्या. आता या दह्यामध्ये एक मोठा चमचा त्रिफळा पावडर घाला आणि हे मिश्रण रात्रभर ठेवा. हा हेअर पॅक सकाळी केसांना लावा आणि 30 ते 35 मिनिटांनी शॅम्पू करा. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा ही पद्धत वापरू शकता. यामुळे कोंडा पूर्णपणे साफ होईल.
कडुलिंबाचे पाणी
कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून उकळवा. हे पाणी थंड करत ठेवा. त्यानंतर शॅम्पू करा. शॅम्पू केल्यानंतर शेवटी कडुलिंबाचे पाणी केसांना लावा. यानंतर 10 ते पंधरा मिनिटे केस तसेच ठेऊन नंतर साध्या पाण्याने धुवा. कडुलिंबाचे पाणी लावल्यावर खाज येत नसल्यास तुमच्या इच्छेने तुम्ही केस तसेच वाळवूही शकता. आठवड्यातून तीन वेळा या पाण्याने केस धुवा, आठवड्याभरात तुमच्या डोक्यातील कोंडा बराच कमी होईल. हा पूर्णपणे रामबाण उपाय आहे, त्यामुळे केसांना कोणतेही रासायनिक नुकसान होण्याची भीती नाही.
कोरफडीचा वापर
जर तुमच्याकडे हेअर मास्क लावायला वेळ नसेल तर तुम्ही एलोवेरा जेलमध्ये एरंडेल तेल मिसळून केसांना लावू शकता. हे मिश्रण केसांवर रात्रभर राहू द्या आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. एलोवेरा जेल आणि एरंडेल तेल समान प्रमाणात घेऊन मिसळा. हे मिश्रण रात्री झोपताना केसांना लावा आणि सकाळी शॅम्पू करा. असं आठवड्यातून दोनदा केल्यानं कोंड्याच्या समस्येपासून सुटका होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :