Salman Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पेंटिंगची आवड आहे. पेंटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सलमाननं नुकतीच एक खास पेंटिंग केली. या पेंटिंगचा व्हिडीओ शेअर करून सलमाननं त्याच्या चाहत्यांना खास संदेश दिला आहे.
सलमाननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जमिनीवर झोपून पेंटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करून सलमाननं कॅप्शनमध्ये लिहिले,'तुम्ही आयुष्यात काहीही करा पण तुमच्या आईला त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट करू नका. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.' सलमान त्याच्या आईसोबतचे फोटो शेअर करतो. काही दिवसांपूर्वी सलमाननं त्याच्या आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'आईच्या कुशीत स्वर्ग '
लवकरच सलमानचे टायगर -3 आणि कभी ईद कभी दिवाली हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
- Kiran Mane : किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत केले नागराज आणि 'झुंड'चे कौतुक
- Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर
- Abhishek Bachchan : ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; नेटकऱ्याची बोलती बंद!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha