Salman Khan Lawyer Shrikant Shivade Died : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सलमान खानची (Salman Khan) हिट अँड रन सारख्या महत्वाच्या केसेस लढणारे वकील श्रीकांत शिवडे (Shrikant Shivade) यांचे काल (19 जानेवारी 2022)  निधन झाले आहे. श्रीकांत शिवडे यांना ब्लड कॅन्सर हा आजार झाला होता. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलमान खानसोबतच श्रीकांत यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांच्या केसेस हँडल केल्या होत्या. 


श्रीकांत शिवडे यांनी अनेक हाय प्रोफाअल केसेस लढल्या आहेत. श्रीकांत यांनी शाइनी आहूजा, 2 जी स्पेकट्रम ही केस देखील लढली होती. 20 वर्षा पूर्वी सलमानवर हिट अँड रनचा आरोप लावण्यात आला होता. सलमानची ही केस खूप काळ चालली, या केसमुळे सलमानला कोर्टाने नंतर क्लिन चिट देखील दिली होती. शाइनी आहूजा यांची केस श्रीकांत यांनी 2009 साली हँडल केली. तसेच डायमंड बिजनेसमॅन भरत शाह यांची केस देखील श्रीकांत यांनीच लढली होती.  


सैफ अली खान, तब्बू , सोनाली बेंद्रे आणि निलम यांची शिकार प्रकरणाची केस देखील श्रीकांत यांनी हँडल केली होती. श्रीकांत यांनी  इंडियन लॉ सोसायटी  येथून शिक्षण घेतले होते. आई, पत्नी आणि मुलगा असं श्रीकांत यांचं कुटुंब आहे. श्रीकांत शिवडे यांचे  बोन मॅरो ट्रांसप्लांट झाले होते. प्रृती बिघडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. 


संबंधित बातम्या


Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट


Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भाग्यश्री लिमये साकारणार खडूस बॉसची भूमिका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha