Salman Khan In Riteish Deshmukh Raja Shivaji Marathi Movie: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) म्हणजे, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. साठीला टेकलेल्या भाईजाननं काही दिवसांपूर्वीच शर्टलेस लूक शेअर करून सर्वांना धक्का दिलेला. भाईजानचा फिटनेस, त्याचे सिक्सपॅक अॅब्स पाहून सारेच अवाक् झालेले. आता सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) सिनेमा येणार आहे. याच सिनेमासाठी सलमाननं खूप मेहनत घेतल्याचं बोललं जात आहे. अशातच आता सलमान खाननं चाहत्यांना नवं सरप्राईज दिलं आहे. 'बॅटल ऑफ गलवान' सोबतच सलमान खान आणखी एका सिनेमात झळकणार आहे, याबाबत नुकतीच अपडेट समोर आली आहे. रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) आगामी सिनेमा 'राजा शिवाजी'मध्ये (Raja Shivaji) सलमान खान झळकणार आहे. तसेच, तो या सिनेमात छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातल्या जीवाभावाच्या मावळ्याची भूमिका साकारणार आहे. 

Continues below advertisement


गेल्या काही वर्षांत बॉलिवूडच्या दिग्गजांच्या सिनेमांना पाहिजे तसं यश मिळालेलं नाही. सलमान खानचे तर सिनेमे बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटले. रश्मिकासोबत केलेल्या 'सिकंदर'कडून अपेक्षा होती, पण या सिनेमाचीही जादू प्रेक्षकांवर फारशी चालली नाही. अशातच आता सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'च्या (Battle of Galwan) जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तसेच, या सिनेमासाठी सलमान खाननं घेतलेली मेहनत पाहता, प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच, आता तो रितेश देशमुखच्या छत्रपती शिवरायांवरच्या सिनेमात झळकणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे भाईजानच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खान


रितेश देशमुख छत्रपती शिवरायांवर सिनेमा घेऊन येत असून त्याचं नाव 'राजा शिवाजी' असं असणार आहे. प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असणाऱ्या या सिनेमामध्ये सलमान खान आणि त्यासोबतच संजय दत्त सुद्धा झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आधारित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान आणि संजय दत्त दोघांचं शूटिंग शेड्युलही लॉक झालं आहे. संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे त्याचं शेड्युल डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. 'राजा शिवाजी' सिनेमात सलमान कोणती भूमिका साकारणार याचीही उत्सुकता लागली आहे. 


'राजा शिवाजी' सिनेमात सलमान खान कोणती भूमिका साकारणार? 


रितेश देशमुखच्या आगामी सिनेमात तो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, सलमान खान जिवा महाला या शूर मावळ्याची भूमिका साकारणार आहे. जिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. दांडपट्टा चालवण्यात तरबेज असणाऱ्या जीवा महाला यांनीच प्रतापगडाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते. त्यामुळेच "होता जीवा, म्हणून वाचला शिवा" हे वाक्य म्हटलं गेलेलं. मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्त या सिनेमात अफझल खानाची भूमिका साकारणार आहे. 


दरम्यान, सलमान खाननं यापूर्वीही रितेश देशमुखच्या सिनेमांमध्ये कॅमिओ केलेला. रितेश देशमुखचा गाजलेला सिनेमा 'लय भारी'मध्येही सलमान खान दिसलेला. त्यानंतर 'वेड' सिनेमातही तो रितेशसोबत एका गाण्यात दिसलेला.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Virat Kohli Anushka Sharma: कधीकाळी विराट-अनुष्काचं झालेलं ब्रेकअप, एकमेकांचं तोंडही न पाहण्याचं ठरवलेलं; मग सलमान खाननं दिला 'तो' एक सल्ला अन्...