Salman Khan : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या हत्येचा कट हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगने रचला असल्याची महिती समोर आली. त्यामध्ये पोलिसांनी चार आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आता याच प्रकरणात पोलिसांनी पाचव्या आरोपीला देखील अटक केली आहे. 


लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगमधील साथीदारला पनवेल शहर पोलिसांनी आणि नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातू गँगस्टर जॉनी वाल्मिकीला हरियाणातून अटक केली आहे. त्याने यामध्ये सामील असणाऱ्या आरोपींची बाहेरुन मदत केल्याचं समोर आलं आहे. त्याचप्रमाणे त्याने आरोपींची राहण्याची आणि गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांची व्यवस्था करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. तसेच तो व्हिडिओ कॉलद्वारे आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीये. 


सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे होते आदेश


सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी  अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 


सलमानच्या घरात गोळी


या गोळीबारातील एक गोळी सलमान खानच्या घरात घुसली असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी गॅलरीतील पडद्यातून  आरपार गेली आणि भिंतीवर लागली असल्याचे समोर आले. 


ही बातमी वाचा : 


Dharmendra : दोन लग्नांनंतरही 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत होतं धर्मेंद्रंचं अफेअर, हेमा मालिनींनी कसा वाचवला होता संसार?