Salman Khan Ex-Girlfriend Somy Ali Shocking Claim : सध्या मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मॉलीवूडबाबत दररोदज नवनवीन खुलासे समोर येक आहेत. हेमा समितीच्या अहवालानंतर मल्याळम इंडस्ट्रीमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरण उजेडात आलं आहे. यानंतर अनेक प्रसिद्ध मॉलीवूड अभिनेते आणि दिग्दर्शकांवर अभिनेंत्रीनी पुढे येत आरोप केले आहेत. अनेक मल्याळम अभिनेत्रींनी #MeToo मोहिमेमध्ये सहभाग घेत आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाच्या घटनांचा खुलासा केला आहे. आता सलमान खानच्य एक्स-गर्लफ्रेंडनेही याबाबत मोठा खुलासा केला आहे.
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनेही (Salman Khan Ex Girlfriend Somy Ali) बॉलिवूडबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने 90 च्या दशकात काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. बॉलिवूडमध्ये काम करताना यादरम्यान तिने काही धक्कादायक गोष्टी अनुभवल्या ज्याचा तिने आता खुलासा केला आहे. सोमी अलीने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे की, तिला सांगण्यात आलं होतं की, जर तिला तिचं करिअर पुढे न्यायचं असेल तर तिला तडजोड करावी लागेल आणि काही खास सेलिब्रिटींच्या रूममध्ये जावं लागेल.
"अनेक महिलांना रुममधून अस्ताव्यस्त बाहेर पडताना पाहिलंय"
सोमी अलीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या लैंगिक छळाबद्दल सांगितलं आहे. सोमी अलीने सांगितलं की, तिने अनेक महिलांना दिग्गज अभिनेत्यांचा रुममधून पहाटे-पहाटे अस्ताव्यस्त परिस्थितीत बाहेर पडताना पाहिलं आहे. हे असे अभिनेते होते, ज्यांना समाजात एक फॅमिली मॅन म्हणून आदराने पाहिलं जातं, मान-सन्मान दिला जातो. सोमी अलीच्या या खुलाशानंतर एकच खळबळ माजली आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीतल तिने हा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, सोमी अलीने कोणत्याची अभिनेत्याचं नाव उघड केलेलं नाही. तिने पुढे सांगितलं की, हा अभिनेता महिलांसोबत असभ्य वर्तनासाठी ओळखला जातो.