Lock Upp Show : छोट्या पडद्यावरील लॉकअप (Lock Upp Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत. लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)ही करते. या शोमध्ये फॅशन डिझायनर सायशा शिंदे (Saisha Shinde) ही परत आली आहे. सायशाला कंगनासोबत भांडण केल्यामुळे शोमधून बाहेर काढले होते. सायशानं शोमध्ये परत आल्यानंतर एक अपोलॉजी लेटर वाचलं. त्यामुळे आता शोमध्ये पुन्हा परत आल्यानंतर सायशानं कंगनाची माफी मागितली आहे. 


अल्ट बालाजीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये सायशा म्हणते की, 'मी शोमधून बाहेर गेली होती. सोशल मीडियावर #BringBackSaisha ट्रेंड झाले होते. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मी तिथल्या दुनियेमध्ये हरवली. ज्यामध्ये माझी आई आणि माझ्या चार मांजरी होत्या. माझ्या बहिणीचे ती चार वर्षाची असताना निधन झाले. माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा खूप वेगळा असतो. मी माझ्या आयुष्यातील व्यक्तींचा कधीच अनादर केला नाही.'





'मी कंगनाची माफी मागते कारण ती या जेलची मालकिन आहे. हजार कैदी येतील पण जेलची मालकिन एकच राहिल. तिनं हा शो तयार केला आहे. जर कंगना नसेल तर लॉक- अप देखील नसेल.' असही सायशा म्हणाली. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha