Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, कुणी कुणी कोरलं पुरस्कारावर नाव? जाणून घ्या...
जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 04 Apr 2022 11:57 AM

पार्श्वभूमी
Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार...More
Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मानाचा पुरस्कार कोण पटकावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीयांना कधी पाहता येणार?64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये पार पडतो आहे. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतीय प्रेक्षकांना 4 एप्रिलला सकाळी 5:30 वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. हा सोहळा प्रेक्षक Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. पॉप बँड BTS ग्रॅमी अवॉर्ड्सच्या मंचावर थिरकणार आहे. या गटाला ग्रॅमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. याशिवाय गागा, ब्रँडी कार्ली, जस्टिन बीबर, सिल्क सोनिकसह अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत.
Grammy Awards 2022 : 'WE ARE' ठरला 'अल्बम ऑफ द इयर'
'WE ARE' ठरला 'अल्बम ऑफ द इयर'