Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attacked) चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने सैफ अली खानच्या हातावर आणि पाठीवर वार केले. या घटनेनंतर सैफ अली खानला (Bollywood Actor Saif Ali Khan Marathi News) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात सैफ अली खानवर छोटी शस्त्रक्रिया देखील झाली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थित असल्याचे सांगण्यात आले आहे.  याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.






सैफ अली खानवर जेव्हा चाकू हल्ला झाला, त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य नेमके कुठे होते, याची अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही. मात्र करिश्मा कपूरने 9 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एख पोस्ट शेअर केली होती. यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि करिश्मा कपूर एकत्र असल्याचे पोस्टद्वारे दिसून येत आहे. करिश्माने शेअर केलेली ही इन्स्टाग्रामवरील स्टोरी करिना कपूरने शेअर केली आहे. तसेच यानंतर करिना कपूर घरी गेल्याचं देखील सांगण्यात येत आहे. परंतु अधिकृत माहिती मुंबई पोलिसांकडून किंवा सैफ अली खानच्या टीमकडून देण्यात आलेली नाही.


मुंबई पोलिसांनी काय म्हटले?


सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला. यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्ती यांच्यात हाणामारी झाली. यावेळी अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितले. 


Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार, VIDEO: 



संबंधित बातमी:


Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानची चोराशी झटापट, अंगावर चाकूचे वार, लिलावती रुग्णालयात उपचार


Saif Ali Khan Injured: सैफच्या मानेवर 10 सेमीची जखम, हातावर 10 वार, पाठीत धारदार शस्त्रही खुपसलं; मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं?