मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावरील हल्ला प्रकरणात एका संशयीत व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जाईल. जवळपास अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीला मध्यरात्री सव्वा दोन ते अडीच्या दरम्यान एका व्यक्तीनं हल्ला केला होता. त्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता. मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या शोधासाठी अनेक पथकं तयार केली होती. मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत वांद्रे पोलीस स्टेशनला नेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हाच आहे का याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जाणार आहे.
सैफ अली खान याच्यावरी हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अनेकांची चौकशी केली होती. वांद्रे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशीसाठी बोलावलं आहे. फरार आरोपीसंदर्भात नवे धागेदोरे मुंबई पोलिसांना मिळतात का हे स्पष्ट होईल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडे फोन नसल्याची माहिती आहे. जर एखादा फोन असता तर तो नंबर ट्रेस करुन त्याच्यापर्यंत पोहोचता आलं असतं. हा जर सराईत गुन्हेगार होता तर काही अन्य गुन्ह्यांची उकल होऊ शकते. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मन्नतची भिंत ऊंच असल्यानं त्यासोबत संरक्षक जाळी असल्यानं एका व्यक्तीला आत घुसण्यामध्ये अपयश आलं होतं, अशी माहिती आहे.
पोलिसांवर याप्रकरणात दबाव आहे. वांद्रे पोलीस स्टेशनच्या परिसरात एकामागोमाग घटना घडल्यानं दबाव वाढला होता. एका अभिनेत्याच्या घरी जाऊन हल्ला होत असल्यानं पोलिसांवरील दबाव वाढला होता. आता मुंबई पोलिसांना यश आलं असून त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी इमारतीच्या पायऱ्यांवरील एका सीसीटीव्हीत कैद झाला होता. याशिवाय वांद्रे रेल्वे स्थानकाच्या ब्रीजवरुन उतरताना देखील आरोपी सीसीटीव्हीत दिसला होता.
इतर बातम्या :
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; आरोपीच्या मुसक्या कधी आवळणार?